दोन ट्रकची समोरासमोर धडक, दाेन ठार, अपघातात ३०० बकऱ्यांचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 13:33 IST2024-05-02T13:31:12+5:302024-05-02T13:33:51+5:30
Yavatmal : यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ अपघात

Major Accident near Saykhed Dharan fata Yavatmal
वणी (यवतमाळ) : यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास परस्पर विरूद्ध दिशेने धावणाऱ्या दोन ट्रकची टक्कर झाली. या भीषण अपघातात ट्रकमधील दोनजण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झालेत. अपघातातील मृत व जखमींची अद्याप ओळख पटली नाही.
या अपघातात ट्रकमधील ३०० बकऱ्यासुध्दा ठार झाल्यात. चंद्रपूर येथून सिमेंट भरून यवतमाळकडे निघालेल्या एमएच ४० एम२८५८ क्रमांकाचा ट्रक आणि मध्यप्रदेशातून तेलंगणात बकऱ्या भरून निघालेला एमएम ४० सीटी ५५५८ क्रमांकाचा ट्रक, या दोन ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर झाली. अपघातात ट्रकमधील दोनजण जागीच ठार झाले तर ट्रकमधी सुमारे ३०० बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले.
जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जखमींना तातडीने उपचारार्थ दवाखान्यात रवाना करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पांढरकवडा पोलिसांनी दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी मरण पावलेल्या बकऱ्यांचा मोठा खच पडून आहे.