ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:06 PM2017-10-13T23:06:07+5:302017-10-13T23:06:19+5:30
पंपावरून पेट्रोल भरुन निघालेल्या दुचाकीला भरधाव ट्रॅव्हल्सने चिरडल्याने दोन तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
धनोडा : पंपावरून पेट्रोल भरुन निघालेल्या दुचाकीला भरधाव ट्रॅव्हल्सने चिरडल्याने दोन तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील धनोडाजवळ शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातानंतर ट्रॅव्हल्सही झाडावर जाऊन आदळली.
संदीप संजय खिल्लारे (१८), सय्यद अन्वर अली (१९) रा. अनमाळ ता. माहूर जि. नांदेड अशी ठार झालेल्यांची नावे आहे. तर विकास भगवान नरवाडे (१८) रा. अनमाळ असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील अनमाळ येथील हे तीन तरुण आपल्या दुचाकीने धनोडा येथे आले होते. धनोडाजवळील पेट्राल पंपावर पेट्रोल भरुन बाहेर निघत असताना भरधाव ट्रॅव्हल्सने (क्र.एम.एच-०९-सीव्ही-०५३२) जबर धडक दिली. धडक एवढी जबर होती की, या तिघांंनाही २० फुटापर्यंत फरफटत नेले.
ट्रॅव्हल्सच्या खाली अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस चौकीचे प्रभारी एएसआय विकास सिडाम, रवी महल्ले, मनोज डुमरे, महागावचे एपीआय कैलास भगत, सुरेश पवार, नीलेश सिरसाट, अवधूत हिंगाडे, रुपेश डोंगरे, धम्मानंद केवटे, गजानन राठोड, युवराज जाधव घटनास्थळी दाखल झाले.