बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:28 PM2019-01-21T22:28:10+5:302019-01-21T22:28:49+5:30

पांढरकवडा मार्गावरील साखरा येथे एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

Two wheelers killed in bus crash | बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next
ठळक मुद्देएक बचावला : घाटंजी-पांढरकवडा मार्गावरील अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : पांढरकवडा मार्गावरील साखरा येथे एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
संतोष अशोक टेकाम (२५) रा.मांगुर्डा, ता.केळापूर असे मृताचे नाव आहे. या अपघातात दुचाकी चालक प्रवीण पोतू टेकाम बचावला. पांढरकवडा ते नागपूर ही बस (क्र.एम.एच. ४०-वाय ५७८३) घाटंजीमार्गे नागपूरकडे जात होती. याचवेळी घाटंजीकडून प्रवीण आणि संतोष दुचाकीने (क्र.एमएच २९/टी ८५२०) घाटंजीकडून पांढरकवडाकडे जात होते. साखरा येथील वळणावर दुचाकी बसवर आदळली. यात संतोष जागीच ठार झाला.
प्रवीण रोडच्या बाजूला पाण्याच्या डबक्यात फेकला गेल्यामुळे किरकोळ जखमी झाला. मात्र तो थोडक्यात बचावला. मागे बसलेला संतोष मात्र बसची जोरदार धडक बसल्याने जागीच ठार झाला. प्रवीण व संतोष रविवारी येळाबारा येथे नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.
दरम्यान, माहिती देवूनही तब्बल दीड तासाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यामुळे घटनास्थळी काही काळ तणाव पसरला होता. गावकऱ्यांनी मृतदेह उचलू देण्यास नकार दिला होता. पोलीस दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांचा एका पोलीस कर्मचाºयाशी चांगलाच वाद झाला. गावकऱ्यांनी त्याला चोप दिल्याचे सांगितले जाते. या अपघातामुळे घाटंजी-पांढरकवडा मार्गावरील वाहतूक तीन तास खोळंबली होती. जखमी प्रवीणला घाटंजी ग्रामीण रुग्णालयात हलविले. पोलीस उपनिरीक्षक गणपत पुप्पूलवार यांनी गावकऱ्यांना शांत केले. दरम्यान तणावाची परिस्थिती बघता जादा कुमूक बोलाविण्यात आली होती. पारवा पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला असता नागरिक आक्रमक झाले होते. पीएसआय पुप्पूलवार यांनी हा वाद मिटविला.

Web Title: Two wheelers killed in bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.