पांढरकवडातील अपघातात दोन युवक ठार, एक जखमी

By admin | Published: April 17, 2016 02:22 AM2016-04-17T02:22:06+5:302016-04-17T02:22:06+5:30

टिप्परने दुचाकीला जबरदस्त धडक देऊन चिरडत नेल्याने दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.

Two youths killed, one injured in road accidents | पांढरकवडातील अपघातात दोन युवक ठार, एक जखमी

पांढरकवडातील अपघातात दोन युवक ठार, एक जखमी

Next

टिप्परची मोटरसायकलला धडक : विहीर खोदायला जात होते
पांढरकवडा : टिप्परने दुचाकीला जबरदस्त धडक देऊन चिरडत नेल्याने दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना पांढरकवडा-मांगुर्डा मार्गावरील एका पोल्ट्री फार्मजवळ शनिवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास घडली.
सुनील टिकाराम आत्राम (३५) रा. वाढोणा (बंदी) ता.झरी आणि सतिश दादाराव कनाके (३१) रा.सोनबर्डी ता. पांढरकवडा, अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात सतीश बाबाराव धुर्वे (२८) रा.सिंगलदीप, ता.राळेगाव हा गंभीर जखमी झाला. शनिवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास गवंडी काम करणारे हे तीन युवक दुचाकीने (एम.एच.२९-एफ.३४५२) ने पांढरवकडा येथून वणी तालुक्यातील नांदेपेरा या गावाकडे विहिर खोदण्याच्या कामासाठी जात होते. त्याचवेळी मांगुर्डा येथून एम.एच.२९-एम.५८० हा टिप्पर वेगाने पांढरकवडाकडे येत होता. वेगाने येणाऱ्या या टिप्परने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या धटकेत दुचाकीला अक्षरश: काही मीटर अंतर चिरडत नेले. यात सुनील आत्राम व सतिश कनाके हे दोघे जागीच ठार झाले. सतीश धुर्वे हा गंभीर जखमी झाला. अपघात घडताच टिप्परचालकाने तेथून पळ काढला होता.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर जखमींना येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र मृतकांची बराच वेळ ओळख पटली नव्हती. ओळख पटविण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरने करीत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Two youths killed, one injured in road accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.