नेर येथील दोन युवक रेल्वेतून पडून गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 09:52 PM2019-06-02T21:52:25+5:302019-06-02T21:52:29+5:30
अशोकनगर परीसरातील दोन यूवक मुंबईला कामासाठी जात असताना धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जूनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली.
नेर (यवतमाळ)- नेर येथील अशोकनगर परीसरातील दोन यूवक मुंबईला कामासाठी जात असताना धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जूनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नेर येथील ८ ते १० युवक कामाकरिता मुंबईला जाण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेस बडनेरा येथून निघाले. नांदुरा रेल्वे स्थानकावरून गाडी पुढे जाताच गाडीमधून अक्षय सुरजुशे (वय २२वर्षे) व मनीष पंचबुद्धे (वय २६ वर्षे) हे दोघेही पडून गंभीर जखमी झाले .घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाऊंडेशनचे विजय वानखडे, ईश्वर चांभारे व निलेश राजपूत आदींनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी युवकांना तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले.
मात्र प्रकृती अस्वास्थामुळे त्या गंभीर युवकांना पुढील उपचारार्थ खामगाव येथे हलविण्यात आले. चौकशीअंती हे युवक नेरचे असल्याची माहिती मिळताच ओमसाई फांउडेशनने त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. सदर दोन्ही युवकांवर खामगाव येथे उपचार सुरू आहेत.