उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा यवतमाळात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:52 PM2019-11-27T13:52:57+5:302019-11-27T13:54:12+5:30

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित होताच यवतमाळात शिवसैनिकांनी जल्लोष केला.

Uddhav Thackeray's Chief Minister's Yavatmal celebrates | उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा यवतमाळात जल्लोष

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा यवतमाळात जल्लोष

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसैनिकांनी फोडले फटाकेपदाधिकाऱ्यांचे मुंबईला प्रस्थान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित होताच यवतमाळात शिवसैनिकांनी जल्लोष केला.
येथील दत्त चौकात आतिषबाजी करण्यात आल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान उध्दव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळयाला उपस्थित राहण्यासाठी मोठया संख्येत शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईला रवाना होत आहे.
महाराष्ट्रात लोकविकास आघाडीतर्फे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी उध्दव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. उध्दवजी ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तसेच जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंन्द्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, तालुका प्रमुख संजय रंगे, गिरीष व्यास, व्यापारी आघाडीचे प्रमुख प्रविन निमोदीया, अनिल यादव, गजानन इंगोले, प्रकाश जाधव, संदीप सरोदे, चंद्रकांत उडाखे, गोपाळ पाटील, नगरसेवक उध्दवराव साबळे, सुजीत मुनगिनवार, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, राजेन्द्र कोहरे, चेतन शिरसाट, सुनिल कटकुळे, राजु राऊत, अमोल पाटील, गोलु जोमदे, रुषी इलमे, नगरसेविका कनाके ताई, राजु शेख, तेजस कदम, शंकर देऊळकर, रविन्द्र कोल्हे, विक्रम सोळंकी, हेमंत उगले, निलेश लडके, अर्पित घुगरे यांच्यासह मोठया संख्येत शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.


शेतक-यांचा सातबारा कोरा व्हावा- गायकवाड
राज्यात आता उध्दवजींच्या नेत्रृत्वात सरकार स्थापन होत असल्याने
शेतक-यांचे सर्व संकट दुर करण्याचा प्रयत्न होईल. शेतक-यांचा सातबारा कोरा व्हावा ही शिवसेनेची मागणी होती. त्यामुळे संपुर्ण कर्जमुक्तीची घोषणा लवकरच होईल यात कुठलीच शंका नाही.

-- राजेन्द्र गायकवाड
जिल्हाप्रमुख, शिवसेना यवतमाळ

Web Title: Uddhav Thackeray's Chief Minister's Yavatmal celebrates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.