उमरखेडात तूर खरेदी पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 10:11 PM2017-08-03T22:11:55+5:302017-08-03T22:12:46+5:30

राज्य सरकारने शेतकºयांकडील तूर खरेदी करण्याबाबत पुन्हा आदेश दिले. त्यानुसार येथील बाजार समिती यार्डात २७ जुलैपासून खरेदी सुरू झाली.

Umarkhedat purchase of tur to stop again | उमरखेडात तूर खरेदी पुन्हा बंद

उमरखेडात तूर खरेदी पुन्हा बंद

Next
ठळक मुद्देगोदामाचा अभाव : पणन महासंघाचे नियोजन विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : राज्य सरकारने शेतकºयांकडील तूर खरेदी करण्याबाबत पुन्हा आदेश दिले. त्यानुसार येथील बाजार समिती यार्डात २७ जुलैपासून खरेदी सुरू झाली. मात्र, लवकरच धान्य गोदाम पूर्ण भरल्याने तूर ठेवण्यास जागा राहिली नाही. परिणामी २ आॅगस्टपासून तुरीची सर्व खरेदी बंद झाली आहे. पणन महासंघाच्या विस्कळीत नियोजनामुळे शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे.
उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात २७ जुलैपासून २ आॅगस्टपर्यंत ६०० क्विंटल तूर खरेदी केली. खरेदी केलेले धान्य गोदामात ठेवले जात होते. परंतु गोदाम पूर्ण भरल्याने आता तूर खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, १६ जानेवारी ते ६ जूनपर्यंत झालेल्या नियोजनबद्ध खरेदीत ३५ हजार ६४२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित एक हजार ३३९ शेतकºयांनी रितसर नोंदणी केली होती. शासनाने प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा पंचनाम्यात ७४३ शेतकºयांकडे दहा हजार २४६ क्विंटल तूर असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ३१ मेपर्यंत नोंदणीकृत व पंचनामे झालेल्या शेतकºयांकडील तूर खरेदी करावी, असे आदेश दिले. त्यामुळे २२५ शेतकरीच पात्र ठरले. उर्वरित शेतकºयांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.
तूर खरेदी झाल्यानंतर साठवणूक करून घेण्याची हमी जिल्हा मार्केटींग विभागाने उचलली आहे. परंतु असे कोणतेही कार्य येथे दिसून येत नाही म्हणून तूर खरेदी सुरू ठेवण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे २ आॅगस्टपासून खरेदी बंद झाली आहे. आता आपली तूर कधी विकली जाणार, याची चिंता शेतकºयांना भेडसावत आहे.

उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकाºयांना दिली जाईल. ही समस्या तत्काळ निकाली काढली जाईल. शेतकºयांकडील तुरीचे काटे करण्यासाठी अधिक उपाययोजना केल्या जातील.
- संदीप जाधव
सचिव, बाजार समिती

Web Title: Umarkhedat purchase of tur to stop again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.