उमरसरा ग्रामपंचायतीचा पालिकेत जाण्याचा ठराव
By admin | Published: August 9, 2015 12:02 AM2015-08-09T00:02:42+5:302015-08-09T00:02:42+5:30
उमरसरा ग्रामपंचायतीने नगरपरिषदेत विलीन होण्याचा ठराव एकमताने घेतला आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
यवतमाळ : उमरसरा ग्रामपंचायतीने नगरपरिषदेत विलीन होण्याचा ठराव एकमताने घेतला आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
शहराच्या हद्दवाढीसाठी नगरपरिषद क्षेत्राला लागून असलेल्या वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा, डोर्ली, गोदणी, भोसा व उमरसरा या ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामसभेचा ठराव मागविला. उमरसरा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्व सदस्यांनी नगरपरिषदेत विलीन होण्याचा ठराव मान्य केला. हा ठराव मान्य करताना काही अटी ठेवण्यात आल्याचे सरपंच योगेश मानकर यांनी सांगितले. इतर ग्रामपंचायतीत नुकत्याच निवडणूका झाल्याने अजून पदाधिकाऱ्यांची निवड झालेली नाही. त्यामुळे विलीनीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही. मोहा ग्रामपंचायतीने याबाबत अजून कोणातच निर्णय घेतलेला नाही, असे सरपंच किशोर बढे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)