उमरखेडच्या भूमिपुत्राची मुंबईत कौतुकास्पद कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:35+5:302021-07-16T04:28:35+5:30

शिवचरण हिंगमीरे विडूळ : मुंबई येथील लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात २९ वर्षीय महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या छातीतून ...

Umerkhed's Bhumiputra's admirable performance in Mumbai | उमरखेडच्या भूमिपुत्राची मुंबईत कौतुकास्पद कामगिरी

उमरखेडच्या भूमिपुत्राची मुंबईत कौतुकास्पद कामगिरी

Next

शिवचरण हिंगमीरे

विडूळ : मुंबई येथील लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात २९ वर्षीय महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या छातीतून उमरखेडचे भूमिपुत्र असलेले डॉ. अमेय चक्करवार यांनी दीड फूट लांबीची सळई बाहेर काढून तिला जीवदान दिले.

एका २९ वर्षीय महिलेच्या छातीत १८ इंच लांबीची लोखंडी सळई घुसली होती. गेल्या १९ जून रोजी त्या महिलेवर मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही कठीण शस्त्रक्रिया एक प्रकारचे डॉक्टरांना आव्हान होते. मात्र, उमरखेड येथील भूमिपुत्र असलेले डॉ. अमेय चक्करवार यांनी हे आव्हान लिलया पेलले. त्या महिलेच्या छातीतून शस्त्रक्रिया करून दीड फूट लांबीची सळई बाहेर काढली.

डॉ. अमेय उमरखेड येथील डॉ. अशोक चक्करवार यांचे सुपुत्र आहेत. डॉ. अमेय यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने तीन तास शिकस्तीचे प्रयत्न करून शस्त्रक्रिया पार पाडली. त्यामुळे एका सामान्य कुटुंबातील त्या महिलेला जीवदान मिळाले. डॉ. अमेय यांच्या कार्याची दखल घेत मुंबईच्या महापौर पेडणेकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कामगिरीमुळे उमरखेड तालुक्यात डॉ. अमेय यांचे कौतुक होत आहे. उमरखेड तालुक्यासाठी ही बाब मान उंचावणारी ठरली आहे.

बॉक्स

पित्याची प्रेरणा आली कामी

डॉ. अमेय यांचे वडील डॉ. अशोक चक्करवार हे गेल्या ४० वर्षांपासून उमरखेड शहरात कार्यरत आहेत. त्यांनी दोन्ही मुलांना डॉक्टर केले. त्यांनी डॉक्टरसोबतच मुलांना आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. त्यांच्या प्रेरणेनेच हे कार्य करू शकल्याचे डॉ. अमेय चक्करवार यांनी सांगितले.

Web Title: Umerkhed's Bhumiputra's admirable performance in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.