उमरखेडला हजार वृक्ष लावण्याचा संकल्प
By admin | Published: June 21, 2017 12:33 AM2017-06-21T00:33:27+5:302017-06-21T00:33:27+5:30
एक हजार वृक्ष लागवण व संवर्धनाचा संकल्प हाती घेत मागील वर्षात पहिल्या टप्प्यात तीनशे झाडे
संवर्धनही करणार : औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचा उपक्रम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : एक हजार वृक्ष लागवण व संवर्धनाचा संकल्प हाती घेत मागील वर्षात पहिल्या टप्प्यात तीनशे झाडे लावून व त्यांचे संवर्धन व संगोपन करून ह्या वर्षातील वृक्षारोपणाचा श्रीगणेशा शहरातील श्रीकृष्ण मंदिराजवळील परिसरात गोकुळ नगर रोडवर करण्यात आला.
समितिद्वारे वृक्ष लावण्यासाठी महाश्रमदान करण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनास औदुंबर वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये मराठा सेवा संघ, उद्देश सोशल फाऊंडेशन, अंबोना कृती समिती व शहरातील विविध संघटना व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदान करून समितीच्या कार्यात आपले योगदान दिले.
यावेळी स्वामी समर्थ मंदिराच्या आवारात माजी आमदार विजय खडसे यांच्या अध्यक्षतेत एक कार्यक्रम घेण्यात आला. विजय रेघाटे, वसंत जाधव यांनी विचार व्यक्त केले. नगर परिषदेचे अध्यक्ष नामदेव ससाणे यांनी समितीस पाचशे रोपटे व ट्री गार्ड देण्याचे आश्वासन दिले. उपाध्यक्ष अरविंद भोयर यांनी सवोर्तोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. भाजपा शहर अध्यक्ष महेश काळेश्वरकर यांनी दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त समितीस एक हजार रुपये देण्याचा संकल्प केला. मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी अकराशे रुपये दिले. समितीचे सदस्य गोविंद काळे, डॉ. एस. पी. गोरे , सुरेंद्र कोडगिरवार, डॉ. अरुण बंग शिवाजीराव माने, रेघाटे काका,प् लक्ष्मीकांत नंदनवार, गजानन चौधरी, दिलीप भंडारे, अक्रमभाई, दानेश्वर खांडरे, संतोष माने, समितीचे कार्यध्यक्ष दीपक ठाकरे आदींसह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.