बेवारस गुटखा घेतला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 AM2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:46+5:30
लगतच्या एका नाल्यात गुटख्याचे अनेक पोते टाकण्यात आले. वाहात ही पोती माहूर व बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैनगंगा नदीत गेली. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यांनी अद्याप कोणतीच हालचाल केली नाही. महागाव पोलिसांनी मात्र राहूर रोडवरील नाल्यातून गुटख्याचे काही पोते व कट्टे ताब्यात घेतले. पोलिसांनी जवळपास ६८ हजार ९४0 रुपये किमतीचे १३ पोते ताब्यात घेतले.
फुलसावंगी येथून जवळच असलेल्या नाल्यात व पैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात शुक्रवारी गुटखा मिळून आला. महागाव पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील गुटखा नाल्याच्या बाहेर काढून ताब्यात घेतला आहे. पैनगंगा नदीतील घटनास्थळ बिटरगाव आणि माहूर ठाण्याच्या हद्दीत येते.
लगतच्या एका नाल्यात गुटख्याचे अनेक पोते टाकण्यात आले. वाहात ही पोती माहूर व बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैनगंगा नदीत गेली. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यांनी अद्याप कोणतीच हालचाल केली नाही. महागाव पोलिसांनी मात्र राहूर रोडवरील नाल्यातून गुटख्याचे काही पोते व कट्टे ताब्यात घेतले. पोलिसांनी जवळपास ६८ हजार ९४0 रुपये किमतीचे १३ पोते ताब्यात घेतले.
पुढील कारवाईसाठी हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक उमेश भोसले, जमादार माणिक पवार, जमादार विलास राठोड, होमहार्ड संदीप पवार यांच्या चमूने ही कारवाई केली. या गुटखा तस्करीचे तार आर्णीपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा आहे. हा गुटखा फुलसावंगंी परिसरात कसा आला, कुठून आला, कोणी आणला, कोणी साठा केला, याबाबत विविध चर्चा आहे. कुणाच्या आशीर्वादाने प्रतिबंधीत गुटख्याची साठेबाजी करण्यात आली, हेसुद्धा कोडेच आहे. आता पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागापुढे तस्करांना शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
हस्तकाकडे होता साठा
पैनगंगा नदी पात्रात गुटख्याची अनेक पोती आढळल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. तस्करीशी संबंधितांकडून आर्णी येथील एका तस्कराचे नाव चर्चेत आले. हा गुटखा अनेक दिवसांपासून एका ‘हस्तका’कडे साठवलेला होता. लॉकडाऊनमुळे त्याची विल्हेवाट लावणे हस्तकाला गरजेचे झाले होते.
त्या हस्तकाने गुटखा जाळण्याचा मुहूर्त शोधला होता. मात्र ठरल्यावेळी रात्री पोलीस विभागाच्या ‘बडा अधिकारी’ फुलसावंगी परिसरात येणार असल्याची टिप मिळाल्याने घाईगबडीत त्या हस्तकाने गुटखा नाल्यात फेकून दिल्याची चर्चा आहे.