उमरखेडमध्ये अनधिकृत बोअरवेलचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 09:51 PM2019-03-24T21:51:07+5:302019-03-24T21:51:45+5:30

उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विनापरवाना बोअरवेलचा व्यवसाय जोमात सुरू आहे. परराज्यातून भाडेतत्त्वावर मशीन आणून कमिशनपोटी अनेकांनी अनधिकृत खोदकाम सुरू केले आहे.

Unauthorized bore wells in Umarkhed | उमरखेडमध्ये अनधिकृत बोअरवेलचा सपाटा

उमरखेडमध्ये अनधिकृत बोअरवेलचा सपाटा

Next
ठळक मुद्देपर्यावरण विभागाचे दुर्लक्ष : पालिकेसह ग्रामपंचायतींचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विनापरवाना बोअरवेलचा व्यवसाय जोमात सुरू आहे. परराज्यातून भाडेतत्त्वावर मशीन आणून कमिशनपोटी अनेकांनी अनधिकृत खोदकाम सुरू केले आहे.
पाण्याची पातळी खालावल्याने ४०० ते ५०० फुटापर्यंत जमिनीत बोअर करण्यात येत आहे. पर्यावरण विभागाच्या नियमांची पायमल्ली हात असतानाही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. शासन आदेशानुसार मर्यादेपेक्षा अधिक खोलवर बोअर करणे गुन्हा आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून उमेदवारांकडून मतदारांना बोअर मारून देण्याचे प्रलोभन दाखविण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोअरवेल मशीन निवडणूक आयोगाच्या रडारवर राहणार आहे. निवडणूक होईपर्यंत किमान या प्रकारावर पायांबद घालण्याची मागणी होत आहे.
त्याच प्रमाणे रस्त्याची वजन भार मर्यादा तेवढीच महत्वाची आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची बोअरवेल मशीनच्या रहदारीने चाळणी होत आहे. एरवी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडून ओव्हरलोड वाहनांवर दंड ठोठावण्यात येतो. परंतु बोअरवेल वाहनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या गैरप्रकाराबाबत स्थानिक ग्रामपंचायती आणि उमरखेड नगरपालिकाही दुर्लक्ष करीत आहे.
विनापरवाना बोअरवेलचा आडोसा घेऊन मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल लपविली जात आहे. निवडणूक काळात परराज्यातून येणाऱ्या व्यावसायिकांच्या माध्यमातून तालुक्यात अनधिकृतरित्या पैसा पसरविला जात असल्याची शंका आहे. अनेक गावांमधील बोअरवेल एजंटच्या हालचाली बघता हा संशय अधिक बळावत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Unauthorized bore wells in Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी