सीईओंच्या सुनावणीवरही अविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 09:51 PM2018-08-13T21:51:12+5:302018-08-13T21:51:31+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये शिक्षकांच्या प्रमाणपत्रांवर आक्षेपांचा पाऊस पडल्यावर आता सीईओंनी घेतलेल्या सुनावणीबाबतही अविश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुनावणीचा संपूर्ण अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करीत अन्यायग्रस्त महिला शिक्षिकांनी सोमवारी जिल्हा परिषदेपुढे सत्याग्रह आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये शिक्षकांच्या प्रमाणपत्रांवर आक्षेपांचा पाऊस पडल्यावर आता सीईओंनी घेतलेल्या सुनावणीबाबतही अविश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुनावणीचा संपूर्ण अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करीत अन्यायग्रस्त महिला शिक्षिकांनी सोमवारी जिल्हा परिषदेपुढे सत्याग्रह आंदोलन केले.
यावेळी शिक्षक शिक्षक संघर्ष समितीच्या महिला आघाडीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. १४ जुलैच्या सुनावणीचा अहवाल प्रसिद्ध करावा, सुनावणीला दांडी मारणाºया शिक्षकांची पुन्हा सुनावणी घ्यावी, बदलीत लाभ व सूट घेणाºया सर्व शिक्षकांची चौकशी करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
निकषात न बसणारे प्रमाणपत्र जोडून व चुकीचे अंतर दाखवून काही शिक्षकांनी लाभ घेतला. त्यांनी व त्यांच्या जोडीदारांनी अडवून ठेवलेल्या जागा अवघड ठिकाणी पदस्थापना मिळालेल्या महिला शिक्षिकांना देण्यात याव्या. विस्थापित व तक्रारकर्त्या शिक्षकांवर आधीच अन्याय झालेला आहे. त्यामुळे आता त्यांच्या प्रतिनियुक्त्या करू नये, अशी मागणी करण्यात आली.
बदल्यांच्या गुºहाळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे वांदे
बदल्यांमध्ये अनियमिततेचा आरोप करीत शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासनाला शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापासूनच धारेवर धरले आहे. सतत निवेदने, आंदोलने यातच शिक्षक व्यस्त आहेत. शिक्षक नेते सर्वसामान्य शिक्षकांना कामी लावत आहे. कोणता शिक्षक कोणत्या शाळेत राहणार की जाणार, याबाबतची अनिश्चितता अजूनही कायम आहे. त्यात अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असून विद्यार्थ्यांचे वांदे झाले आहेत. याबाबत काही शिक्षकांनी खंतही व्यक्त केली.