टँकरच्या धडकेत काका-पुतण्या ठार; मृतामध्ये जवानाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 09:04 PM2018-12-16T21:04:03+5:302018-12-16T21:04:07+5:30

मारेगावची घटना : रजेवरील जवानाचा समावेश

 uncle-nephew killed in a tanker accident | टँकरच्या धडकेत काका-पुतण्या ठार; मृतामध्ये जवानाचा समावेश

टँकरच्या धडकेत काका-पुतण्या ठार; मृतामध्ये जवानाचा समावेश

Next

मारेगाव (यवतमाळ) : येथून करंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ टँकरने दिलेल्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार झाले. यात काका-पुतण्याचा समावेश आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. 


वासूदेव बापूराव कोयचाडे (४५) आणि सचिन यशू कोयचाडे (२५) अशी अपघातात ठार झालेल्या काका-पुतण्यांची नावे आहे. मृतक दुचाकीने (क्र.एम.एच.२९-एक्यू-७५०) कामानिमित्त खडकी (बुरांडा) येथून मारेगावला आले होते. काम आटोपून सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते मारेगाववरून खडकीकडे जाण्यासाठी निघाले. या मार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ करंजीकडून येणाºया टँकरने (क्र.एम.एच.३४-बीजी-३१७७) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकी जवळपास २५ फूट फरफटत गेली. यामुळे वासुदेव कोयचाडे व सचिन कोयचाडे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. 


मृतक सचिन कोयचाडे हा सीआरपीएफमध्ये जवान म्हणून कार्यरत होता. सध्या आसाममध्ये तो तैनात होता. गेल्या २८ नोव्हेंबरपासून तो रजेवर गावी आला होता. रविवारी कामानिमित्ताने मारेगावला आल्यानंतर परत जाताना ही घटना घडल्याने त्याचा बळी गेला. मारेगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title:  uncle-nephew killed in a tanker accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.