अंत्यविधीसाठी निघालेल्या मामा-भाचीचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 04:30 PM2023-09-25T16:30:35+5:302023-09-25T16:31:47+5:30

अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल

uncle-niece who went for funeral dies after hitting by a truck | अंत्यविधीसाठी निघालेल्या मामा-भाचीचा अपघाती मृत्यू

अंत्यविधीसाठी निघालेल्या मामा-भाचीचा अपघाती मृत्यू

googlenewsNext

पांढरकवडा (यवतमाळ) : राष्ट्रीय महामार्गावरील गोंडवाकडी जवळ एका भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या भीषण अपघातात नातेवाईकाच्या अंतसंस्कारासाठी दुचाकीवर निघालेल्या मामा-भाचीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. विश्वनाथ नानाजी कोवे (३७) रा. आसोली, सलोनी सत्यवान मडावी (२१) रा.चालबर्डी असे मृत मामा-भाचीचे नाव आहे.

विश्वनाथ कोवे हे त्यांच्या एका नातेवाईकांकडे अंत्यविधीसाठी झरीजामणी तालुक्यातील कमळवेल्ली येथे भाची सलोनी हिला दुचाकीवर (क्रमांक एम एच २९ ५८६९) बसवून घेऊन जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील गोंडवाकडी गावाजवळ एक अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमध्ये विश्वनाथचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या सलोनीचा पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: uncle-niece who went for funeral dies after hitting by a truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.