यवतमाळात होणार भूमिगत गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:44 PM2017-09-15T23:44:20+5:302017-09-15T23:44:46+5:30

नगरपरिषद क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी भूमिगत गटार योजनेसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले.

Under the yavatmal, underground sewerage | यवतमाळात होणार भूमिगत गटार

यवतमाळात होणार भूमिगत गटार

googlenewsNext
ठळक मुद्देप्राथमिक सर्वेक्षण : ८१ चौरस किलोमीटरचा परीघ, पथकाकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषद क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी भूमिगत गटार योजनेसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. अहमदाबादच्या केंद्र सरकार नियुक्त कन्संलटन्सीच्या दोन अभियंत्यांनी सर्वेक्षणासाठी लागणारी जुजबी माहिती घेतली.
नगरपरिषदेने ‘अमृत’ योजनेतंर्गत २४ तास पाणी पुरवठा व भूमिगत गटार योजनेला प्राधान्य दिले. यात बेंबळा प्रकाल्पातून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. आता भूमिगत गटार योजनेसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयातर्फे ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी अमृत योजनेतून आर्थिक तरतूद करण्यात आली. या योजनेच्या कामाला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे.
पालिकेचे विस्तारीत क्षेत्र ८१.५० चौरस किलोमीटर आहे. या संपूर्ण परिसरात ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी अहमदाबाद येथील कन्सलटंन्सीच्या दोन अभियंत्यांनी शहराची लोकसंख्या, भौगोलिक रचना आदींची माहिती घेतली. त्यावरून तयार आराखड्यानुसार संपूर्ण शहराचा ‘मायक्रो सर्व्हे’ केला जाणार आहे. त्याकरिता अहमदाबादच्या कन्सलटन्सीची संपूर्ण टीम यवतमाळात येणार आहे. आक्टोबर महिन्यात योजनेच्या अंतिम सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. या योजनेसाठी शहरात सातही दिवस पाणीपुरवठा असणे आवश्यक आहे. ही समस्या बेंबळा प्रकल्पातून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे सुटणार आहे. त्यात तब्बल ३० टक्के पाणी यवतमाळसाठी आरक्षित आहे.
दोन्ही योजनांचा लाभ
निळोणा, चापडोह या मध्यम प्रकल्पासह आता बेंबळा प्रकल्पातून पाणीपुरवठ्याचा पर्याय उपलद्ध झाल्याने शहराची पाणीटंचाईची समस्या येत्या काही वर्षात सुटण्याची शक्यता आहे. त्याला पूरक भूमिगत गटारी योजना कार्यान्वीत झाल्यास, या दोन्ही योजनांचा लाभ यवतमाळकरांना एकाचवेळी घेता येणार आहे.

या योजनेसाठी निधीची कमतरता पडणार नाही. निर्धारित काळात काम करणाºया कंपन्या निवडल्या असून त्यांच्याकडूनच भूमिगत गटार योजनेचा डीपीआर तयार केला जाणार आहे. एकाच वेळी संपूर्ण शहरात काम न करता झोनप्रमाणे सुरूवात करण्याचे निर्देश दिले.
- मदन येरावार,
पालकमंत्री यवतमाळ

Web Title: Under the yavatmal, underground sewerage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.