शहरातील भूमिगत वीज जोडण्या जीवावर उठल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:26 PM2019-07-08T21:26:58+5:302019-07-08T21:27:10+5:30

वीज वितरण कंपनीचा कारभार यवतमाळकरांच्या जीवावर उठणारा आहे. येथील आर्णी मार्गावर विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला. त्यानंतरही वीज कंपनीने अथवा कंत्राटदारांनी धडा घेतला नाही. अनेक भागात वीज कंपनीने लावलेल्या फ्यूज पेट्या सताड उघड्या आहे. जमिनीवरच या पेट्या असल्याने खेळताना लहान मुले, मोकाट जनावर याचा सहज स्पर्श होऊ शकतो. या जटील समस्येकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसून येते.

Underground electricity connections in the city get resurrected | शहरातील भूमिगत वीज जोडण्या जीवावर उठल्या

शहरातील भूमिगत वीज जोडण्या जीवावर उठल्या

Next
ठळक मुद्देफ्यूज नसलेल्या पेट्या उघड्या : पावसाचे पाणी साचल्याने अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीज वितरण कंपनीचा कारभार यवतमाळकरांच्या जीवावर उठणारा आहे. येथील आर्णी मार्गावर विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला. त्यानंतरही वीज कंपनीने अथवा कंत्राटदारांनी धडा घेतला नाही. अनेक भागात वीज कंपनीने लावलेल्या फ्यूज पेट्या सताड उघड्या आहे. जमिनीवरच या पेट्या असल्याने खेळताना लहान मुले, मोकाट जनावर याचा सहज स्पर्श होऊ शकतो. या जटील समस्येकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसून येते.
शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरची वीज जोडणी भूमिगत करण्यात आली. शिवाय अनेक नागरी वसाहतीमध्ये भूमिगत वीज जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. श्रीकृष्णनगर, दर्डानगर येथील अगदी जमिनीवर असलेल्या फ्यूज पेट्या उघड्या आहे. या परिसरातूून सकाळी व दुपारनंतर शालेय विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या फ्यूज पेट्या थेट अपघाताला आमंत्रण देत आहेत. विशेष म्हणजे येथे किटकॅटमध्ये एकही फ्यूज नाही. तेथे फ्यूजसाठी तांब्याची तार वापरण्याऐवजी थेट अर्थिंग तारचा वापर फ्यूज म्हणून केला आहे. कुठे वीजपुरवठा शॉट झाल्यानंतरही येथील फ्यूज उडणार नाही, अशी स्थिती आहे. अगदी जमिनीवरच या पेट्या असल्याने अनावधानाने जरी त्याला स्पर्श झाला तरी थेट इहलोकीचा प्रवास सुरू होतो.
आर्णी मार्गावर दुभाजकामध्ये जिवंत विद्युत प्रवाहाची केबल उघडी होती. याचा स्पर्श होऊन बांधकाम ठेकेदाराचा मत्यू झाला होता. आता पुन्हा तिच चूक केली जात आहे. शहरातील बहुतांश भागात अशा भूमिगत वीज जोडणीच्या पेट्या लागल्या आहेत. दर्डानगर -श्रीकृष्णनगर चौफूलीवर असलेल्या पेटीचे दार उघडे असून वीज तारा उघड्या पडल्या आहेत. याकडे ताताडीने लक्ष देऊन त्याला तत्काळ बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title: Underground electricity connections in the city get resurrected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.