पशुधन पालनाचे महत्त्व समजून घ्या

By admin | Published: August 9, 2015 12:10 AM2015-08-09T00:10:35+5:302015-08-09T00:10:35+5:30

शेतीचे नियोजन करताना जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुधन पालनाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

Understand the importance of livestock keeping | पशुधन पालनाचे महत्त्व समजून घ्या

पशुधन पालनाचे महत्त्व समजून घ्या

Next

अधिकाऱ्यांना अपेक्षा : अंबोडा येथे शेतकरी जागृती अभियान
महागाव : शेतीचे नियोजन करताना जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुधन पालनाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. कुठल्याही कामाचे नियोजन असल्यास शेतकरी मागे येणार नाही, असे मत अंबोडा येथे शेतकरी जागृती अभियानांतर्गत आयोजित शेतकरी जनसंवाद कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. जनआंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे अध्यक्षस्थानी होते. अमृतराव देशमुख, दादाराव ठाकरे, हनवंतराव देशमुख यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढत असताना प्रमुख अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत जाऊन काही नवीन उपाययोजना करता येते का, यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे, असे जगदीश नरवाडे यांनी आयोजनाची भूमिका मांडताना सांगितले. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सोनकुसरे यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुधन पालनाचे नियोजन केले पाहिजे. जोडधंदा म्हणून आपण दुग्ध व्यवसाय करतो. परंतु दूध देणाऱ्या जनावरांच्या चारा-पाण्याचे नियोजन करत नाही. नियोजनातील बारकावे समजून घेतले तरच दुग्ध व्यवसायात अपेक्षित वाढ होईल.
कर्जपुरवठ्यासाठी आम्ही कटिबद्ध आहो. शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्याची क्षमता निर्माण करावी. बँक साखळी पद्धतीने चालते. साखळी थांबली तर पुढील ग्राहक थांबला म्हणून समजा. बँकेच्या धोरणाचा फायदा घ्या, असे यावेळी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक सोनकांबळे यांनी सांगितले. जलशिवार योजनेच्या माध्यमातून सिंचन सुविधांचे स्त्रोत गावागावांत पोहोचत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे तालुका कृषी अधिकारी आर.डी. राठोड म्हणाले.
विद्युत कंपनीचे सहाय्यक उपअभियंता गजभिये यांनी वीज पुरवठ्याबाबत गावकऱ्यांची असलेली मागणी जवळपास पूर्ण केल्याचे सांगितले. मागणीनुसार डीपी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन नायब तहसीलदार श्याम पांडे यांनी दिली. प्रसंगी गटविकास अधिकारी पी.डी. शेळके यांनी पंचायत समितीसंदर्भातील तक्रारींचा निपटारा केला. या कार्यक्रमात तालुक्यातील काही प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.शिंदे यांनी संचालनाची जबाबदारी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Understand the importance of livestock keeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.