पांढरकवडा तालुक्यात तुरीवर अज्ञात रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 09:54 PM2017-11-04T21:54:48+5:302017-11-04T21:55:06+5:30
तालुक्यात कापूस, सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाने शेतकरी अगोदरच चिंतेत असताना आता तुरीच्या पिकावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यात कापूस, सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाने शेतकरी अगोदरच चिंतेत असताना आता तुरीच्या पिकावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे.
जिल्ह्यात २२ शेतकरी, शेतमजुर किटनाशक फवारणीमुळे मृत्यूमुखी पडले. या घटनानंतर कृषी सेवा केंद्र संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. किटकनाशक विक्रीला बंदी केल्यामुळे तुरीवर फवारणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. दररोज तापमानात होणारा बदल हा तुरीवर आलेल्या रोगाला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीनचे पीक शेतकºयांच्या हातून गेले आहे. कपाशीच्या पिकांचीही हीच परिस्थिती आहे. कापूस हाती येत आहे. परंतु कापसाला भाव नाही. शेतकºयांना आपला सोन्यासारखा कापूस कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकºयांचा कुणीही वाली नाही. कापसाला भाव मिळत नाही. कवडीमोल भावात कापूस विकावा लागतो म्हणून बºयाच शेतकºयांनी सोयाबीनची लागवड केली. परंतु निसर्गाने दगा दिला आणि पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले.
लागवडीचाही खर्च निघाला नाही. अशीच एकंदर तालुक्यात परिस्थिती आहे. काही शेतकºयांनी तर सोयाबीनचे पिकच्या पीक मोडून टाकले. कापूस, सोयाबीन पिकामुळे शेतकरी तोट्यात जाऊन कर्जबाजारी झाला असल्याने तो अतिशय चिंतेत आहे. शेतकºयांची परिस्थिती अशी बिकट झाली असताना शासनाकडून यावर कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने शेतकºयांमध्ये चिड व्यक्त केली जात आहे. आश्वासने देऊन शेतकºयांची बोळवण केली जात आहे. प्रत्यक्षात या शेतकºयांच्या हाती काहीही मिळत नाही. सोयाबीनचे पीक गेले, तुरीचे पीक सलाईनवर आहे. त्यामुळे हे पीकदेखिल शेतकºयांच्या हातून जाण्याची चिन्हे आहे. रबीचा हंगामही तोट्या जाण्याची शक्यता आहे. जमिनीती ओलावा नाही, नद्या नाल्यांना पाणी नाही. त्यामुळे रबी पिकांना फटका बसणार आहे.