गणवेशधारी कर्मचारी चहा टपरीवर

By Admin | Published: September 24, 2016 02:37 AM2016-09-24T02:37:56+5:302016-09-24T02:37:56+5:30

जिल्हा परिषदेने अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केला. सोमवार आणि शुक्रवारी हे अधिकारी, कर्मचारी गणवेषात येऊ लागले.

Uniformed staff tea walker | गणवेशधारी कर्मचारी चहा टपरीवर

गणवेशधारी कर्मचारी चहा टपरीवर

googlenewsNext

जिल्हा परिषद : कार्यालयीन वेळेत चकल्लस, तासन्तास असते उपस्थिती, कामे करतात तरी केव्हा ?
यवतमाळ : जिल्हा परिषदेने अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केला. सोमवार आणि शुक्रवारी हे अधिकारी, कर्मचारी गणवेषात येऊ लागले. परिणामी चहा टपरीवरही आता गणवेषधारी कर्मचारी चकल्लस करताना दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेने महत्प्रयासाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला. काही कर्मचाऱ्यांनी या ड्रेस कोडला विरोधही केला. त्यांच्यापुढे नमते घेत अखेर प्रशासनाने ड्रेस कोडची सक्ती नसून अधिकारी, कर्मचाऱ्यांना गणवेष ऐच्छिक केला. एकाच गणवेषात असल्यास शिस्त दिसून पडते, म्हणून प्रशासनाने सुरूवातीला ड्रेस कोड सक्तीचा करण्याबाबत पावले उचलली होती. आता हा गणवेष ऐच्छिक आहे. मात्र त्यातून शिस्त दिसून येत असल्याने बहुतांश अधिकारी, कर्मचारी आता गणवेषात कार्यालयात येऊ लागले आहे.
जिल्हा परिषदेत सोमवार आणि शुक्रवारी गणवेषातील अधिकारी, कर्मचारी दिसून येतात. यामुळे जिल्हा परिषदेत येणाऱ्या सामान्य नागरिकाला त्यांची शिस्तप्रियता कळून येते. प्रशासनाच्या या निर्णयाचे त्यांना कुतूहलही वाटते. मात्र तेच कर्मचारी ज्यावेळी कार्यालयीन वेळात रस्त्यांवरील चहा टपरीवर दिसून येतात, त्यावेळी सामान्य नागरिकांचा तिळपापड होतो. पूर्वी कर्मचारी गणवेषात नसल्याने चहा टपरीवर असलेले नागरिक कोण आहेत, हे ओळखू येत नव्हते. मात्र आता ते चक्क गणवेषातच टपरीवर चहा पिताना दिसत असल्याने त्यांच्या शिस्तीचा दिंढोरा पिटला जात आहे.
गणवेषधारी कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील चहा टपरीवर बघून नागरिकांना संताप येत आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळात ते तेथे दिसत असल्याने त्यांचा संताप रास्तही ठरत आहे. दुपारी २.३0 वाजताच्या मध्यान्ह काळात ते टपरीवर आढळल्यास कुणालाच आश्चर्य वाटत नाही. मात्र कार्यालयीन वेळात ते चहा पिताना दिसत असल्याने हे कर्मचारी नेमके काम कधी करतात, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (शहर प्रतिनिधी)

अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
गणवेषातील कर्मचारी चहा टपरीवर दिसत असल्याने ड्रेस कोडच्या शिस्तीचेच वाभाडे निघत आहे. त्यातून ‘शिस्तप्रिय’ कर्मचाऱ्यांचे ओंगळवाणे दर्शन नागरिकांना घडत आहे. एकप्रकारे जिल्हा परिषद आणि प्रशासनाचे वाभाडे काढणारी ही शिस्तप्रियता ठरत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळात नजिकच्या चहा टपऱ्यांवर चक्कर मारून याची खातरजमा करावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Uniformed staff tea walker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.