दारव्हा येथे विद्यापीठ स्तरीय व्हर्चुअल करियर गाईडन्स टॉक सिरिज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:31 AM2021-09-02T05:31:31+5:302021-09-02T05:31:31+5:30
व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. पृथ्वीराजसिंग राजपूत यांनी केले. अध्यक्षस्थानी डॉ. संगीता घुईखेडकर होत्या. प्राचार्य डॉ. विलास राऊत, डॉ. किशोर हुरडे, ...
व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. पृथ्वीराजसिंग राजपूत यांनी केले. अध्यक्षस्थानी डॉ. संगीता घुईखेडकर होत्या. प्राचार्य डॉ. विलास राऊत, डॉ. किशोर हुरडे, डॉ. प्रशांत बागेश्वर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. राजपूत यांनी ‘रसायनशास्त्रातील संधी’ यावर मार्गदर्शन केले. आठ दिवस चाललेल्या या सिरिजमध्ये आठ व्याख्यान झाले. तारानी कुमार (जपान), प्रा. राहुल मापार, विशाल लथ्थे, नाशित खान, परश्राम आखरे, डॉ. यादवकुमार मावळे, आदित्य शेंडे आदी वक्त्यांनी विद्यार्थ्यांना जापनीज कंपन्या, गणित, मॅनेजमेंट फिल्ड, कॉम्प्युटर सायन्स, उद्योजकता, भूगर्भशास्त्र व भौतिकशास्त्र अशा विविध क्षेत्रातील उपलब्ध व्यवसायाच्या संधींविषयी मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास राऊत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुनील चकवे, डॉ. किशोर हुरडे, डॉ. प्रशांत बागेश्वर, डॉ. चांडक प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. राऊत, डॉ. चकवे, डॉ. चांडक यांनी विचार मांडले. या मलिकेत विविध महाविद्यालयातील ४४९ विद्यार्थी सहभागी झाले होते. संचालन प्रा. धनश्री कोठेकर, तर आभार डॉ. बागेश्वर यांनी मानले.