पुसदमध्ये पाणी पुरवठ्यासाठी रोटेशन पद्धत वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:29 AM2021-06-03T04:29:35+5:302021-06-03T04:29:35+5:30

गेल्या महिनाभरापासून तर या परिसरात ‘रात्रीस खेळ चाले’, या उक्तीप्रमाणे पाणीपुरवठा विभागाकडून पाणी पुरविले जाते. कधी हवा, तर कधी ...

Use rotation method for water supply in Pusad | पुसदमध्ये पाणी पुरवठ्यासाठी रोटेशन पद्धत वापरा

पुसदमध्ये पाणी पुरवठ्यासाठी रोटेशन पद्धत वापरा

googlenewsNext

गेल्या महिनाभरापासून तर या परिसरात ‘रात्रीस खेळ चाले’, या उक्तीप्रमाणे पाणीपुरवठा विभागाकडून पाणी पुरविले जाते. कधी हवा, तर कधी पाणी आणि कधी काहीच नाही, असा लपंडाव सुरू आहे. या त्रासाला कंटाळून बुधवारी सर्व नागरिकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रुपेश चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी मागण्या ऐकून घेतल्या. लवकरच यावर तोडगा काढला जाईल आणि नियमित वेळेत पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही दिली. या वेळी नगरसेविका डॉ. रुपाली जयस्वाल, प्रा. अशोक तिवारी, मुकुंद देशपांडे, दीपक महल्ले, कोंडबाराव मुढाणकर, प्रा. गजानन जाधव, हेमंत मेश्राम, बालाजी घाटगे, विजय क्षीरसागर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Use rotation method for water supply in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.