वहम् आणि अहम् हे तणावाचे कारण

By admin | Published: February 28, 2017 01:27 AM2017-02-28T01:27:16+5:302017-02-28T01:27:16+5:30

जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ हे भयंकर मानसिक तणावाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केली आहे. आज चौघांमध्ये एक जण तणावाखाली जगत आहे.

Vaam and ego are the reason for stress | वहम् आणि अहम् हे तणावाचे कारण

वहम् आणि अहम् हे तणावाचे कारण

Next

प्रभा मिश्रा : उमरखेड येथे ‘तणावमुक्ती व उपाय’ विषयावर अध्यात्मिक प्रवचन
उमरखेड : जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ हे भयंकर मानसिक तणावाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केली आहे. आज चौघांमध्ये एक जण तणावाखाली जगत आहे. हा तणाव दुसऱ्या कुणी निर्माण केला नसून चुकीच्या पद्धतीने विचार केल्यामुळे आपणच आपल्यावर ओढवून घेतलेले संकट होय. आपल्यातील वहम म्हणजे अनाठायी शंका आणि अहम म्हणजे अहंकार हेच प्रचंड मानसिक तणावाला कारणीभूत आहे, असे प्रतिपादन डॉ.प्रभाबहण मिश्रा (माऊंटअबू) यांनी केले.
येथील माहेश्वरी खुले नाट्यगृहात ‘तणावमुक्ती एवम् सफलता के पांच कदम’ या विषयावर त्यांचे आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय उमरखेड सेवा केंद्रातर्फे हे पाच दिवसीय आध्यात्मिक शिबिर होत आहे. पहिल्या दिवशी २७ फेब्रुवारीच्या सकाळच्या सत्रात मुख्य प्रवचक म्हणून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, तणावग्रस्त अवस्थेतूनही विचाराने आणि धैर्याने मार्ग काढला पाहिजे. सतत वाढत जाणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्या पूर्तीसाठी अविचाराने अवलंबलेल्या मार्गामुळे समस्या वाढून माणूस तणावग्रस्त होत आहे. अनाठायी स्पर्धा, दुसऱ्यांच्याप्रती इर्षा, अनाठायी अहंकार आणि परस्परांविषयी विनाकारण शंका वाढीस लागणे याबाबी मानसिक तणावाला कारणीभूत ठरत आहे. त्यावर कोणत्याही डॉक्टरकडे इलाज नाही.
आपले विचार स्वच्छ आणि मन संतुलित ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी भारतीय अध्यात्म शैलीत परमात्मा चिंतन, मनाच्या स्थिरतेसाठी ध्यान करणे क्रमप्राप्त झाले आहे. डोके थंड ठेवणे, वाणीची मधुरता, परस्परांविषयी प्रेम भावना जोपासून विचाराने काम केले तर तणावमुक्ती साधता येईल. प्रवचन ऐकण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

विद्यार्थिनींचे संस्कृती नृत्य
पाच दिवसीय अध्यात्मिक शिबिराचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी मुख्य प्रवचक म्हणून माऊंटअबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या डॉ.प्रभाबहन मिश्रा, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे, व्यापारी संघाचे नारायणदास भट्टड उपस्थित होते. डॉ.प्रभा मिश्रा यावेळी म्हणाल्या, आपण शरीरालाच सर्वस्व मानून बसलो. मी एक आत्मा आहे, हे विसरलो. आपण बाह्य प्रगती खूप केली. परंतु आंतरिक प्रगती थांबवली. त्यामुळेच आज सगळे जण ताण-तणावात जगत आहेत. आपल्यातील आक्रोश आध्यात्मिक विचार अवलंबूनच घालवता येतील. यावेळी स्थानिक विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृतीवर आकर्षक नृत्य सादर केले. दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Vaam and ego are the reason for stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.