सावळी परिसरातील पोलीस पाटलांची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:23+5:302021-07-02T04:28:23+5:30
काही गावांचे पोलीस पाटील निवृत्त झाले. त्या गावाचा पदभार दुसऱ्या गावाच्या पोलीस पाटलांकडे दिला आहे. एकाच गावाच्या पोलीस पाटलांकडे ...
काही गावांचे पोलीस पाटील निवृत्त झाले. त्या गावाचा पदभार दुसऱ्या गावाच्या पोलीस पाटलांकडे दिला आहे. एकाच गावाच्या पोलीस पाटलांकडे दोन ते तीन गावे असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या स्वाक्षरीसाठी भटकावे लागत आहे. जेथे पद रिक्त आहे, अशा गावात भांडण, तंटे झाल्यास लवकर समेट घडून येत नाही. त्यामुळे गावाला पूर्ण वेळ देणारा पोलीस पाटील देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ही पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागात पोलीस पाटील पदाला महत्त्वाचे स्थान आहे. गावातील शांतता, कायदा व सुव्यवस्था, वरिष्ठांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे, घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविणे आदी कामे त्यांना असतात. भांडण, तंटे गावपातळीवर समेट घडवून आणण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. मात्र, परिसरातील बहुतांश पाटलांची पदे रिक्त आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.