ढाणकीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:45 AM2021-08-27T04:45:27+5:302021-08-27T04:45:27+5:30

ढाणकी : येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा रिक्त आहे. ती तातडीने भरावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व गोपालक करीत आहेत. ...

Vacancy for Veterinary Officer in Dhanki | ढाणकीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा रिक्त

ढाणकीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा रिक्त

Next

ढाणकी : येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा रिक्त आहे. ती तातडीने भरावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व गोपालक करीत आहेत.

उमरखेड तालुक्यातील अनेक गावात दुग्ध संकलन केंद्र उभे करण्यात आले आहे. यामुळे दूध संकलन क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू लागला. परिणामी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे वळले आहे. अनेकांनी गायी, म्हशी घेतल्या आहे. मात्र, प्रत्येक गावात पशुवैद्यकीय दवाखाना स्थापन करणे सरकारला शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीकरिता फिरते पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ढाणकी येथील पशुवैद्यकीय श्रेणी १ दवाखाना आहे. येथील डॉ. बाबासाहेब कुंभार यांची बदली होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र, अद्याप नवीन पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी राठोड, कदम हे अनुभव व कौशल्य पणाला लावून काम करतात. मात्र, पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

260821\img-20210826-wa0035.jpg

ढाणकी पशुवैधकीय अधिकारी याची रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी

Web Title: Vacancy for Veterinary Officer in Dhanki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.