जांबबाजार येथे लसीकरण जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:42 AM2021-04-09T04:42:08+5:302021-04-09T04:42:08+5:30
पुसद : कोरोना लसीबाबत लोकांच्या मनात असणारे समज गैरसमज दूर करून त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तालुक्यातील जांबबाजार येथे ...
पुसद : कोरोना लसीबाबत लोकांच्या मनात असणारे समज गैरसमज दूर करून त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तालुक्यातील जांबबाजार येथे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जनजागृती माेहीम राबविण्यात आली.
मोहिमेचे उद्घाटन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यांचे वय ४५ वर्षांपुढे आहे, अशा सर्व लाभार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्याचे आवाहन सरपंच अनिल माधवराव धुळधुळे यांनी केले. यावेळी उपसरपंच लक्ष्मी जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोर, वाजीद हन्नान, स्वाती सुकलकर, बबिता घोडेकर, जयतुनबी इसाक, सायराबी कादीर, ग्रामविकास अधिकारी भाऊ राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल दुधे, आरोग्य सहाय्यक वासुदेव आडे, व्ही.टी. खाडे, औषध निर्माण अधिकारी वाय. एस. सय्यद, आशा गटप्रवर्तक चंदा कांबळे उपस्थित होत्या.
मोहिमेला गावातील वृद्धांनी प्रतिसाद दिला. गावातच लस उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. सरपंच अनिल धुळधुळे यांनी आशा सेविका प्रमिला शेलाटे, सुनीता धुळधुळे, दीपाली राऊत, वाहन चालक सावळे, संजय चवरे यांचे कौतुक केले. यावेळी संतोष जाधव, गजानन सुकळकर, जावेद अली, अविनाश आखरे, नवाज अली सय्यद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.