उमरखेड येथे लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:47+5:302021-05-08T04:43:47+5:30
पोलीस बंदोबस्त : शासकीय रुग्णालयात नागरिकांची एकच गर्दी उमरखेड : येथील शासकीय रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ...
पोलीस बंदोबस्त : शासकीय रुग्णालयात नागरिकांची एकच गर्दी
उमरखेड : येथील शासकीय रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. लस घेण्यासाठी शुक्रवारी एकच गर्दी उसळल्याने पोलीस बंदोबस्तात लस द्यावी लागली.
शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे नागरिकांना टोकन देऊन लस घेण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची वेगळी रांग बनवून लस देण्यात आली. नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.
उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, ठाणेदार संजय चौबे यांनी तत्काळ केंद्राला भेट देऊन नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश मांडण व डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना देऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाला मार्गदर्शन केले.