ब्राह्मणगाव येथे लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:32 AM2021-04-29T04:32:42+5:302021-04-29T04:32:42+5:30
तालुक्यातील ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र असलेल्या गावांत आरोग्य विभागामार्फत मागील आठवड्यात तब्बल दोनदा लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, ...
तालुक्यातील ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र असलेल्या गावांत आरोग्य विभागामार्फत मागील आठवड्यात तब्बल दोनदा लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, ब्राह्मणगाव येथे लसीकरणासाठी आरोग्य विभाग कमालीची उदासीनता बाळगत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच, अखेर तालुका आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि २३ एप्रिल रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण घेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.भाऊ मस्के यांच्या पुढाकारात लसीकरण करण्यात आलीे.
यावेळी सरपंच परमात्मा गरुडे, पंचायत समिती सदस्य अनिता मार्लेवाड, अविनाश कमठेवाड, अरविंद धबडगे, राजकुमार विणकरे, अशोक निमलवाड, संदीप गोरे, ग्रामविकास अधिकारी भाऊ पडाळकर, औषध निर्माता बालाजी शिरडकर, आरोग्यसेवक गोपाल रोकडे, पुंडलिक माहुरे, आरोग्यसेविका अनिता मरकाम, उषा लोखंडे, आशा गटप्रवर्तक राजश्री वाठोरे, परिचर तुषार जिरवणकर, संगीता म्हैसकर व सर्व आशासेविका उपस्थित होत्या.