सहा लाखांवर बालकांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 09:36 PM2019-01-14T21:36:17+5:302019-01-14T21:36:39+5:30
शहर व ग्रामीण भागातील पाच लाख ७९ हजार ५०७ बालकांना गोवर-रूबेलाची लस देण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेत जिल्ह्याची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहर व ग्रामीण भागातील पाच लाख ७९ हजार ५०७ बालकांना गोवर-रूबेलाची लस देण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेत जिल्ह्याची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्याला गोवर-रूबेला लसीकरणाचे सात लाख आठ हजार ८५७ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालय आदी ठिकाणी मोहीम राबवून लसीकरण केले जात आहे. ग्रामीण व शहरी भागात पाच लाख ७९ हजार ५०७ बालकांना लस देण्यात आली आहे. गोवर-रूबेला व्हायरस देशातून हद्दपार करण्यासाठी विशिष्ट कालावधीत बालकांना ही लस मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
शाळांमध्ये मोहीम राबविण्यासाठी मुख्याध्यापकांची बैठक घेऊन महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तहसीलदारांना यासंदर्भात कळविण्यात आले आहे. काही शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांची भूमिका निराशाजनक असल्याचे दिसून आले. अशा शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली जाणार आहे. शिवाय पालकांच्या मनातील शंकाही दूर केल्या जाणार आहे, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे कळविले आहे.