लस साठवण क्षमता 180 लिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:00 AM2020-12-14T05:00:00+5:302020-12-14T05:00:03+5:30

कोरोना लसीकरण मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी लसीकरणाचे सेशन ठरविण्यात आले आहे. त्यात हेल्थ केअर वर्कर्स यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात एक हजार ९११ हेल्थ केअर वर्कर्स आहेत. तर शहरी भागात १७६ आरोग्य कर्मचारी राहणार आहे. लस पोहोचविण्यासाठी ८२ कोल्ड चेन पाॅईंट तयार करण्यात आले आहे. याच ठिकाणी लस साठविली जाणार आहे.

Vaccine storage capacity 180 liters | लस साठवण क्षमता 180 लिटर

लस साठवण क्षमता 180 लिटर

Next
ठळक मुद्देकोविड लसीकरणाचा पहिला टप्पा : प्रशासन डोळ्यात तेल घालून सज्ज

  लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी लसीकरणाचा नकाशा व वर्क चार्ट तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय १८८ सुपरवायझर आणि ५३८ लसीकरण कर्मचारी (व्हॅक्सीनेटर्स) राहणार आहे. त्यांना लसीकरणाबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पहिला टप्पा हा केवळ आरोग्य यंत्रणेतील व कोविड काळातील फ्रन्टलाईन वाॅरिअर असलेल्यांनाच दिला जाणार आहे. त्यासाठी १४ हजार ५३८ इतकी संख्या निश्चीत केली आहे. 
कोरोना लसीकरण मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी लसीकरणाचे सेशन ठरविण्यात आले आहे. त्यात हेल्थ केअर वर्कर्स यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात एक हजार ९११ हेल्थ केअर वर्कर्स आहेत. तर शहरी भागात १७६ आरोग्य कर्मचारी राहणार आहे. लस पोहोचविण्यासाठी ८२ कोल्ड चेन पाॅईंट तयार करण्यात आले आहे. याच ठिकाणी लस साठविली जाणार आहे. नियोजन करून लसीकरणाला पहिल्या टप्प्यात यशस्वी करण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे. जिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रावर हे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी आरोग्य विभागाकडून डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, कक्ष सहायक, मदतनीस या सर्वांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानंतरच लसीची मागणी झाली. मात्र अजून लसीचा डोज किती असणार हे निश्चीत झाले नाही. त्यामुळे तालुकानिहाय कुणाला किती लस पाठवावी लागेल, याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले.

लस साठविण्यासाठी ११८ फ्रीझर
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे परिपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. ही लस आल्यानंतर साठविण्यासाठी ११८ डीप फ्रीझर जिल्ह्यात उपलब्ध आहेत. एका विशिष्ट तापमानातच कोरोनाची लस ठेवावी लागणार आहे. त्याकरिता ही तयारी करण्यात आली आहे. सुरुवातीला १८० लिटर लस येणार असल्याने त्यासाठीचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. 

लस पोहोचविण्यासाठी एक वाहन
जिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड शिल्ड ही लस पोहोचविली जाणार आहे. पहिला टप्पा असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे एक वाहन निश्चीत करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी वाहने उपलब्ध असून ६६ वाहने सध्या कार्यरत आहेत. गरजेनुसार वितरणासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे. 

Web Title: Vaccine storage capacity 180 liters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.