वंचितने यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा समस्या सोडविण्यासाठी दिली रिकामी घागर भेट
By सुरेंद्र राऊत | Published: February 29, 2024 01:29 PM2024-02-29T13:29:11+5:302024-02-29T13:29:23+5:30
महिलांना,नागरिकांना नळाला पाणी येण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागते असा आरोप वंचितने केला.
यवतमाळ : शहरात होणारा वेळी अवेळी अनियमितता पाणी पुरवठा,आणि इतर समस्या सोडविण्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतिने गुरूवारी जीवन प्राधिकरण कार्यालय यवतमाळ येथे धडक देण्यात आली. यावेळी पाण्याच्या घागरीवरच टंचाईच्या समस्या लिहून पदाधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता यांना रिकामी घागर भेट दिली.
यवतमाळ शहराची तहान भागवणाऱ्या धरणात मुबलक असणारा पाणी साठा, बेंबळा धरणावरून अमृत योजनेतून होणारा पाणी पुरवठा इत्यादी मुबलक पाणी स्रोत असून सुद्धा, फक्त अधिकाऱ्यांच्या बेपर्वाई आणि ढिसाळ नियोजनामुळे शहरात रात्री बेरात्री अनियमितता पाणी,पुरवठा होत आहे. महिलांना,नागरिकांना नळाला पाणी येण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. त्यामुळे रोज ठराविक वेळेनुसार स्वच्छ आणि जंतू विरहित नियमित पाणी पुरवठा करावा,कर्तव्यात कसुर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर कठोर कार्यवाही करावी, इत्यादी समस्या पाण्याच्या घागरीवर लिहून ही घागर कार्यकारी अभियंता यांना प्रतिकात्मक स्वरूपात भेट दिली.
सर्व समस्यांचे तातडीने निवारण करण्याची विनंती करण्यात आली. अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावर कार्यकारी अभियंता यांनी सर्व समस्या तातडीने सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी वंचितचे जिल्हा अध्यक्ष डॉ. निरज वाघमारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक,जिल्हा महासचिव शिवदास कांबळे,युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण कपिले, महिला महासचिव पुष्पा सिरसाट,सरला चचाने महिला उपाध्यक्षा वंदना उरकुडे,मीना रणीत, सचिव भारती सावते शहराध्यक्ष कुंदन नगराळे,शहर महासचिव विलास वाघमारे,शैलेश भानवे कोषाध्यक्ष उत्तमराव कांबळे शह राध्यक्ष करुणा चौधरी,शहर महासचिव रत्नमाला कांबळे,शिला वैद्य,शोभना कोटंबे सुकेशिनी खोब्रागडे आनंद भगत, प्रसेंजित भवरे, सुनील वाघमारे, कल्पना सिरसाट, निशा निमकर,निलेश स्थूल सुधाकर वासनिक, देवानंद कांबळे, प्रवीण करमणकर, संदीप हरणे सतीश कांबळे, सुमती खंडारे, माया मस्के, प्रज्ञा देशभ्रतार, शालू खोब्रागडे,सरिता भोवते सुरेश खंडारे, रेखा मोहोड,पौर्णिमा गजभिये, पूजा राऊत,यांसोबतच वंचित चे शेकडो कार्यकरता उपस्थित होते.