पैनगंगेतील चोरटा कोळसा शिरपूरमार्गे वणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 10:17 PM2018-07-06T22:17:27+5:302018-07-06T22:19:40+5:30

 Vanigat via Gangetic Chorata Coal Shirpur | पैनगंगेतील चोरटा कोळसा शिरपूरमार्गे वणीत

पैनगंगेतील चोरटा कोळसा शिरपूरमार्गे वणीत

Next
ठळक मुद्देलाल पुलियावर विल्हेवाट : तीन पोलीस ठाण्यांची मेहरनजर, कोळशातील ‘दुकानदारी’मुळे राजकीय पक्ष गप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदानीतून चोरट्या मार्गाने निघणारा शेकडो टन कोळसा शिरपूरमार्गे वणीत दाखल होतो. तेथून या कोळशाची विल्हेवाट लावली जाते.
वणीमध्ये कोळशाची मोठी उलाढाल आहे. अनेक राजकीय पक्षांची दुकानदारीच या कोळशावर चालते. त्यातून मिळणारा पैसा राजकारणात वापरला जातो. आजही अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचे कोेळशात हात गुंतलेले आहेत. त्यामुळेच कुणी या कोळशाविरोधात दीर्घकाळ व आक्रमक आंदोलन केल्याचे ऐकिवात नाही. एखादवेळी ते केले तरी केवळ देखावा म्हणून असते. राजकीय पटलावरून कोणतीच ओरड नसल्याने कोळशाचा हा चोरटा व्यापार राजरोसपणे सुरू आहे. त्याला पोलीस व प्रशासनाचेही पाठबळ लाभते. वणी तर चक्क एक पोलीस कर्मचारीच कोळशाच्या या व्यवहारात जणू भागीदार असल्याचे बोलले जाते. कुणाचेही कोळशाचे ट्रक पोलीस कारवाईत ‘अडकू’नये म्हणून हा कर्मचारी खास खबरदारी घेतो. मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेने कोळशाचे दोन ट्रक वणीत पकडले होते. त्यावेळी या कर्मचाºयाने चक्क एलसीबीसोबत वाद घालण्याची हिंमत केली. यावरून या व्यवसायातील त्याची ‘ताकद’ किती हे स्पष्ट होते.
वणी-चंद्रपुरातील खाणींमधून चोरट्या मार्गाने कोळसा बाहेर काढला जातो. त्यात सर्वाधिक कोळसा हा गडचांदूरच्या पैनगंगा खदानीतून काढला जात असल्याचे सांगितले जाते. दररोज किमान दहा ते १५ हायवा ट्रकच्या माध्यमातून शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हा कोळसा वणीत लालपुलियावर आणला जातो.
वणी रेल्वे साईडींगच्या नावाने निघणारा हा कोळसा प्रत्यक्षात लालपुलियावरील अण्णा ब्लॅक मार्केटमध्ये उतरवितो. तेथील भाड्याने घेतलेल्या काही भूखंडावर हा व्यवहार चालतो. खदानीतून दोन रुपये किलोचा निकृष्ट दर्जाचा कोळसा एक नंबरमध्ये एखाद दोन ट्रक घेतला जातो. नंतर याच बिल्टीवर चोरट्या मार्गाने आलेल्या कोळशाची विल्हेवाट लावली जाते. हा कोळसा मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ व अन्य भागात विटभट्टी, छोट्या प्रकल्पांसाठी विकला जातो.
रेल्वे साईडींगसाठी निघणारा हा कोळसा गडचांदूर, शिरपूर, वणी पोलिसांच्या नाकावर टिच्चून लालपुलियाच्या काळ्याबाजारात उतरविला जातो. या व्यवसायात चंद्रपूर जिल्ह्यातील असलम, बडता, हाजी, बाबा हे मास्टर मार्इंड ओळखले जातात. त्यांना त्या पोलीस कर्मचाºयाची मोलाची साथ लाभते. भाड्याने दिलेल्या भूखंडावरून चालणाऱ्या या कोळशाच्या व्यवहारापासून कुणीच अनभिज्ञ नाही. परवाना असला तरी गैरप्रकारात आपले नाव येऊ देऊ नये, एवढीच भूखंड मालकांची अट असते. दरदिवशी दहा ते १५ ट्रक कोळशाच्या या उलाढालीत ही चोरी रोखण्याची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणेतील कुण्या घटकाला त्याच्या दर्जानुसार किती मोठा लाभ मिळत असेल याचा सहज अंदाज येतो. कोळशाच्या व्यवहारातील असे अनेक कारनामे पुढे आले आहेत.
दोन रुपये किलोचा निकृष्ट कोळसा एक नंबरमध्ये विकत घेऊन प्रत्यक्षात त्या बिल्टीवर चोरट्या मार्गाने आलेला चांगल्या दर्जाचा कोळसा पुढे पाठविण्याचे हे प्रकार कोल इंडिया, महसूल प्रशासन, आरटीओ व पोलीस प्रशासनासाठी खुले आव्हान ठरले आहे. या व्यवसायाला राजकीय आशीर्वाद लाभल्यानेच कदाचित प्रशासन आक्रमक भूमिका न घेता ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करीत असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.
दररोज १५ ट्रक चोरट्या कोळशाचे पासिंग
सात वेगवेगळ्या क्रमांकाच्या वाहनातून कोळशाची विल्हेवाट
ट्रक ‘अडकू’नये म्हणून भागीदार पोलीस कर्मचाºयाची धावपळ
आरटीओकडून केवळ ओव्हरलोडची तपासणी
बिल्टी निकृष्ट कोळशाची, पुरवठा चांगल्या कोळशाचा
बोगस बिल्टीचा वापर ४मास्टर मार्इंड चंद्रपूर जिल्ह्यात
लालपुलियाचा म्होरक्या ‘अण्णा’

Web Title:  Vanigat via Gangetic Chorata Coal Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा