‘वायपीएस’मध्ये विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 09:51 PM2017-10-02T21:51:47+5:302017-10-02T21:52:03+5:30
विद्यार्थ्यांना राष्ट्रभाषेचे महत्त्व समजावे तसेच या भाषेचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विद्यार्थ्यांना राष्ट्रभाषेचे महत्त्व समजावे तसेच या भाषेचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जेकब दास उपस्थित होते. समन्वयक अर्चना कढव, रूक्साना बॉम्बेवाला, हिंदी विभाग प्रमुख दिनेश जयस्वाल आदींची मंचावर उपस्थिती होती.
संगीत शिक्षक विशाल शेंदरकर व सचिन वालगुंजे यांच्या मार्गदर्शनात सहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. संत तुलसीदास, रहीमदास, कबीरदास आदींद्वारा लिखित दोहे विद्यार्थ्यांनी सादर केले. कवी हरिवंशराय बच्चन, महादेवी वर्मा यांच्या प्रसिद्ध कविता सादर केल्या. शायरी तसेच हास्य कविता सादर करून विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात रंग भरला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमाचे संचालन गौरी देशपांडे व अर्णवी बोरीकर या विद्यार्थ्यांनी केले. आभार शिक्षिका स्मिता मिश्रा यांनी मानले. कार्यक्रमासाठी हिंदी विषयाच्या शिक्षिका योगिता कडू आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा आदींनी कौतुक केले.