घाटंजी एकता महिला मंडळाच्या विविध ऑनलाइन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:41 AM2021-03-20T04:41:59+5:302021-03-20T04:41:59+5:30

घाटंजी : येथील एकता महिला मंडळाच्या वतीने विविध ऑनलाइन गेम व स्पर्धा घेण्यात आल्या. यानिमित्त ‘महिलांनी अर्थाजन ...

Various online competitions of Ghatanji Ekta Mahila Mandal | घाटंजी एकता महिला मंडळाच्या विविध ऑनलाइन स्पर्धा

घाटंजी एकता महिला मंडळाच्या विविध ऑनलाइन स्पर्धा

Next

घाटंजी : येथील एकता महिला मंडळाच्या वतीने विविध ऑनलाइन गेम व स्पर्धा घेण्यात आल्या.

यानिमित्त ‘महिलांनी अर्थाजन करणे काळाची गरज आहे का?’ या विषयावर लेखन स्पर्धा घेण्यात आली. त्याला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला. हौजी व प्रश्नोत्तर गेम साधना ठाकरे यांनी घेतले. यात प्रथम क्रमांक वैशाली वाघ, मंगला भोयर, राधिका गुंडावार, मेघा गोमेकर, द्वितीय - मंजुषा भोयर, वैशाली वाघ, मंगला भोयर; तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या मनीषा पद्मावार, सोनाली चिंतावार, अनुराधा शहाडे व स्वाती बुक्कावार.

लेखन स्पर्धेत मंगला भोयर, साधना ठाकरे व संगीता भुरे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. पूजा उत्तरवार, स्मिता नार्लावार, कविता कर्णेवार, पद्मा अग्रवाल, पूजा धात्रक व वैशाली कैलासवार यांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रकाश निकम यांनी केले. यशस्वीतेकरिता मंडळाच्या अध्यक्ष माया यमसनवार व सदस्यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Various online competitions of Ghatanji Ekta Mahila Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.