स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृतिदिनानिमित्त आज विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:00 AM2021-11-25T05:00:00+5:302021-11-25T05:00:20+5:30
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, जगविख्यात ऑस्टिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. गोवर्धन लाल पाराशर (जोधपूर, राजस्थान), ‘लोकमत’ मीडिया प्रा. लि. चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, माजी शिक्षण व उद्योगमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, ‘लोकमत’चे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी बाबूजींचे समाधीस्थळ असलेल्या ‘प्रेरणास्थळा’वर आदरांजली, त्यानंतर मातोश्री दर्डा सभागृहाच्या हिरवळीवरून जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचे लोकार्पण होणार असून तीनदिवसीय मोफत ऑस्टिओपॅथी शिबिराचेही उद्घाटन होईल.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, जगविख्यात ऑस्टिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. गोवर्धन लाल पाराशर (जोधपूर, राजस्थान), ‘लोकमत’ मीडिया प्रा. लि. चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, माजी शिक्षण व उद्योगमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, ‘लोकमत’चे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
२५ नोव्हेंबर रोजी गुरुवारी सकाळी ९ ते १० या वेळेत प्रेरणास्थळावर आदरांजली कार्यक्रम होईल. यावेळी स्थानिक गायक कलावंत बाबुजींना गायनातून श्रद्धांजली अर्पण करतील. २५ नोव्हेंबर रोजीच सकाळी १० ते ११.१५ या वेळेत मातोश्री दर्डा सभागृहाच्या हिरवळीवरून जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण होईल. याचवेळी तीनदिवसीय मोफत ऑस्टिओपॅथी उपचार शिबिराचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन होईल. बाबुजी यांचा स्मृती समारोह यवतमाळच्या आरोग्य, शिक्षण व कलेच्या क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
स्मृतिदिनानिमित्त आज होणारे कार्यक्रम
२५ नोव्हेंबर, गुरुवार :
आदरांजली
वेळ : सकाळी ९ ते १०
स्थळ : प्रेरणास्थळ
सादरकर्ते : स्थानिक कलावंत
२५ नोव्हेंबर, गुरुवार :
जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीचे उद्घाटन
वेळ : सकाळी १० ते ११.१५
स्थळ : मातोश्री दर्डा सभागृह
२५ नोव्हेंबर, गुरुवार :
डाॅ.गोवर्धन लाल पाराशर (जोधपूर) यांच्या तीन दिवसीय ऑस्टिओपॅथी कॅम्पचे उद्घाटन
वेळ : सकाळी १० ते ११.१५
स्थळ : मातोश्री दर्डा सभागृह