‘वायपीएस’मध्ये विविध कार्यक्रम
By admin | Published: February 5, 2017 12:54 AM2017-02-05T00:54:11+5:302017-02-05T00:54:11+5:30
यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. अमरचंद दर्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. अमरचंद दर्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी मंचावर प्राचार्य शंकरराव सांगळे, अमरचंद दर्डा, प्रभारी प्राचार्य अर्चना कढव, समन्वयक रुक्साना बॉम्बेवाला, कार्यालय प्रमुख विवेक भोयर, पर्यवेक्षिका निशा जोशी, सीसीए प्रमुख अमोल चन्नूरवार आदी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम चेतक, गजराज, पुष्पक आणि विक्रांत या सदनातील आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. संगीत शिक्षिका विद्या वावरकर आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले. विशाल शेंदरकर यांच्या मार्गदर्शनातही देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रीती लाखकर यांच्या मार्गदर्शनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. आशंता बुटले यांच्या मार्गदर्शनातही देशभक्तीगीतावर नृत्य सादर करण्यात आले.
मार्च ड्रील व पिरॅमीड, बलून ड्रील, स्टंट शो, पिरॅमीड व योग यासह विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना राधिका जयस्वाल, प्रवीण कळसकर, सुदर्शन महिंद्रे, आशंता बुटले, अमोल चन्नूरवार यांचे मार्गदर्शन लाभले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवित शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
यावेळी शंकरराव सांगळे, अमरचंद दर्डा आदींनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन योगिता कडू, श्रृती जोशी यांनी, तर आभार निशा जोशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी अभिजित भिष्म यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)