पोलीस पाटील संघटनेचे विविध प्रश्न प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:18 AM2017-07-18T01:18:43+5:302017-07-18T01:18:43+5:30
पोलीस पाटलांच्या प्रलंबित समस्या निकाली काढाव्या, या मागणीचे निवेदन संघटनेतर्फे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना येथे देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : पोलीस पाटलांच्या प्रलंबित समस्या निकाली काढाव्या, या मागणीचे निवेदन संघटनेतर्फे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना येथे देण्यात आले.
सन २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहराज्यमंत्री आर.आर. पाटील यांनी १२ मागण्या कॅबिनेटमध्ये मंजूर केल्या होत्या. यात पोलीस पाटलांना दरमहा सात हजार ५०० रुपये वेतन, ५०० रुपये प्रवास भत्ता, भरतीमध्ये वारसांना प्राधान्य, पेन्शन किंवा निवृत्तीनंतर दोन लाख रुपये, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अनुकंपा अंतर्गत वारसाला नियुक्ती, अपघात विमा आदी बाबींचा समावेश होता. मात्र अजूनही यावर कार्यवाही झाली नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन सादर करताना पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल नेरकर, उपाध्यक्ष अनिता खडसे, नरेश राऊत, सचिव आशीष लोंदे, विनोद कापसे, भरतसिंह जाधव, पुष्पा सरोदे, रमेश पवार आदी उपस्थित होते.