सखी मंचच्या विविध स्पर्धा उत्साहात

By Admin | Published: August 14, 2016 01:04 AM2016-08-14T01:04:54+5:302016-08-14T01:04:54+5:30

लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना सखींचा

In the various rituals of the Sakhi Forum | सखी मंचच्या विविध स्पर्धा उत्साहात

सखी मंचच्या विविध स्पर्धा उत्साहात

googlenewsNext

रक्षाबंधनाचे औचित्य : सोनल देशमुख, शीतल गायकवाड, राखी खत्री प्रथम
यवतमाळ : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून येथील दर्डा मातोश्री सभागृहात ही स्पर्धा घेण्यात आली. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्पर्धेला सुरूवात झाली.
रव्यापासून गोड पदार्थ, मक्यापासून तिखट पदार्थ आणि राखी तयार करण्याची ही स्पर्धा होती. यामध्ये सहभागी सखींनी रवा आणि मक्यापासून वेगवेगळ््या चवीचे विविध पदार्थ तयार केले होते. शिवाय निर्धारित वेळेत आकर्षक मांडणीही करण्यात आली होती. चव, निटनेटकेपणा, सजावटीला गुण देण्यात आले.
स्पर्धेत सखींनी तयार केलेल्या राख्या लक्षवेधक ठरल्या आहे. आकार, रंगसंगती, निटनेटकेपणा याला गुण देण्यात आले. परीक्षक म्हणून वीणा बेलोरकर, राखी खत्री, रेणु शिंदे यांनी काम पाहिले. रव्यापासून गोड पदार्थ तयार करण्याच्या स्पर्धेत सोनल देशमुख यांनी प्रथम तर दीपा तम्मेवार यांनी व्दितीय क्रमांक प्राप्त केला. मक्यापासून तिखट पदार्थ तयार करण्याच्या स्पर्धेत शीतल गायकवाड प्रथम आल्या. राखी तयार करण्याच्या स्पर्धेत राखी खत्री प्रथम, सुनंदा राजगुरे व्दितीय तर सीमा कोकेवार तृतीय आल्या.
प्रकल्प अधिकारी म्हणून शुभदा हातगावकर, अल्का राऊत, स्मिता गंधे यांनी काम पाहिले. त्यांनी परीक्षकांचे गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत केले. विजयी स्पर्धकांना लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा याच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. संचालन व आभार सखी मंच संयोजिका सिमंतिनी पडाळकर यांनी मानले. (उपक्रम प्रतिनिधी)

Web Title: In the various rituals of the Sakhi Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.