भाजीपाला विक्रेते जिल्हा कचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:16 PM2018-08-03T22:16:22+5:302018-08-03T22:16:43+5:30

येथील आर्णी मार्गावर रस्ता रुंदीकरण झाले असून दुभाजकामुळे आता हातगाडी लावून भाजीपाला विकणे शक्य होत नाही. त्यामुळे उपसमारीची वेळ ओढविली आहे. नगरपरिषदेने या मार्गावर असलेल्या खुल्या भूखंडात दुकान गाळे उपलब्ध करून द्यावे किंवा जागा द्यावी ......

Vegetable vendor District Kacheriar | भाजीपाला विक्रेते जिल्हा कचेरीवर

भाजीपाला विक्रेते जिल्हा कचेरीवर

Next
ठळक मुद्देगाळ्यांची मागणी : जयभोले भाजी विक्रेता संघटनेने सुचविल्या जागा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील आर्णी मार्गावर रस्ता रुंदीकरण झाले असून दुभाजकामुळे आता हातगाडी लावून भाजीपाला विकणे शक्य होत नाही. त्यामुळे उपसमारीची वेळ ओढविली आहे. नगरपरिषदेने या मार्गावर असलेल्या खुल्या भूखंडात दुकान गाळे उपलब्ध करून द्यावे किंवा जागा द्यावी या मागणीसाठी जयभोले भाजी विक्रेता संघटनेने शुक्रवारी दुपारी जिल्हा कचेरीवर धडक दिली.
आर्णी नाक्याजवळ महारुद्र हनुमान मंदिर परिसरात रस्त्यावरच उभे राहून भाजी विक्री केली जाते. हातगाड्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो व वारंवार पोलीस व इतरांकडून अपमानजनक वागणूक सहन करावी लागते. हा प्रकार थांबविण्यासाठी नगरपरिषदेने महारुद्र हनुमान मंदिराला लागून असलेल्या दहा हजार स्वेअर फूट जागेमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अथवा येथे पक्के दुकान गाळे बांधून द्यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक सपना लंगोटे, संघटनेचे अध्यक्ष मनोहर देशमुख, वसीम पठाण, सुरज इंगळे, स्वप्नील गायकवाड, अंकुश उमरतकर, मयूर उमरतकर, दिनेश गुल्हाने, प्रकाश घावडे, सुनील बोरकर, कन्हैया राऊत, समीर शेख, विनायक शिंदे, संजय भगत, खुशाल बुटके, गोलु राजूरकर, गजू उमरतकर आदी उपस्थित होते.

Web Title: Vegetable vendor District Kacheriar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.