चंद्रपूरला दारू घेऊन जाणारे वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:00 AM2020-12-25T05:00:00+5:302020-12-25T05:00:07+5:30
ताे मिनीट्रकमधून (एम.एच.३४ बीजी १००९) दारू नेत असताना पाेलिसांनी ताब्यात घेतले. अवधुतवाडी पाेलीस ठाण्यातील जमादार सतीश चाैधरी यांना गाेपनीय माहिती मिळाली. त्यावरून पाेलिसांनी शनी मंदिर चाैकात सापळा लावला. येथील एका वाइन शाॅप समाेरून दारू घेऊन जात असताना पाेलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. जाजू चाैकात या वाहनाला अडविण्यात आले. ही सर्व दारू चंद्रपूर येथे घेऊन जात असल्याची कबुली वाहन चालक घाेटेकर याने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माेठ्या प्रमाणात दारू पुरवठा केला जाताे. या तस्करीच्या व्यवसायात अनेकांचे हात गुंतले आहेत. बुधवारी शनी मंदिर चाैक येथून दारू खेप घेऊन जाणाऱ्या वाहनाला गाेदणी मार्गावर पकडण्यात यश आले. अवधुतवाडी पाेलिसांनी तब्बल चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मिथून लहानूजी घोटेकर (३५) रा. पंचशील वाॅर्ड चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.
ताे मिनीट्रकमधून (एम.एच.३४ बीजी १००९) दारू नेत असताना पाेलिसांनी ताब्यात घेतले. अवधुतवाडी पाेलीस ठाण्यातील जमादार सतीश चाैधरी यांना गाेपनीय माहिती मिळाली. त्यावरून पाेलिसांनी शनी मंदिर चाैकात सापळा लावला. येथील एका वाइन शाॅप समाेरून दारू घेऊन जात असताना पाेलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. जाजू चाैकात या वाहनाला अडविण्यात आले. ही सर्व दारू चंद्रपूर येथे घेऊन जात असल्याची कबुली वाहन चालक घाेटेकर याने दिली. ही कारवाइ पाेलीस उपनिरीक्षक राहुल गुहे यांच्या नेतृत्वात नरेंद्र बगमारे, गजानन दुधकाेळे, प्रशांत झाेड यांनी केली.
तस्कर रेकॉर्डवर येईल का?
चंद्रपूर, वर्धा, गडचिराेली या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा करणारे तस्कर यवतमाळात सक्रिय आहेत. पाेलीस केवळ वाहन चालकावरच कारवाई करतात. जिल्ह्याबाहेर दारू पाठविणारे परवानाधारक, तस्करीच्या व्यवसायात माेठे मासे कधीच रेकाॅर्डवर येत नाही. त्यामुळे मटका, जुगार प्रमाणे ही कारवाई देखील एक साेपस्कार ठरते.