उपराष्ट्रपती यवतमाळला येण्यास उत्सुक, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीवर्ष कार्यक्रमांची उपराष्ट्रपती धनखड यांच्याकडून प्रशंसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 09:51 AM2023-04-16T09:51:56+5:302023-04-16T09:55:42+5:30
लोकमतचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रशंसा केली आहे. या जन्मशताब्दी वर्षात यवतमाळला भेट देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली : लोकमतचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रशंसा केली आहे. या जन्मशताब्दी वर्षात यवतमाळला भेट देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डाॅ. विजय दर्डा यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती धनखड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी धनखड यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी या मान्यवरांनी देशाच्या राजकीय स्थितीबाबत व अन्य सामायिक विषयांवर चर्चा केली.
उपराष्ट्रपती म्हणाले की, राज्यसभेचे खासदार असताना डाॅ. विजय दर्डा यांनी अनेक महत्त्वाचे विषय सभागृहात उपस्थित केेले होते. त्यांनी लोकशाहीसाठी बहुमोल योगदान दिले आहे.
डाॅ. विजय दर्डा यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात सभागृहात जे विषय उपस्थित केले व भाषणे केली, त्यावर आधारित ‘पब्लिक इश्युज बिफाेर पार्लियामेंट’ हे पुस्तक त्यांनी उपराष्ट्रपती धनखड यांना भेट दिले.