बेधुंद ‘ड्रायव्हिंग’ने घेतला दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 09:09 PM2019-04-21T21:09:56+5:302019-04-21T21:10:23+5:30

शहरातील पांढरकवडा मार्गावर मालानीबागसमोर सुसाट वेगाने जाणारी कार निंबाच्या झाडावर धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस करून आल्यानंतर धुंदीत कार चालविणे जीवावर बेतले. हा थरार शनिवारी रात्री १० वाजता घडला.

The victim of 'Driving' with a crazy 'driving' | बेधुंद ‘ड्रायव्हिंग’ने घेतला दोघांचा बळी

बेधुंद ‘ड्रायव्हिंग’ने घेतला दोघांचा बळी

Next
ठळक मुद्देपांढरकवडा मार्गावर थरार : कारच्या धडके ने झाडही तुटून कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील पांढरकवडा मार्गावर मालानीबागसमोर सुसाट वेगाने जाणारी कार निंबाच्या झाडावर धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस करून आल्यानंतर धुंदीत कार चालविणे जीवावर बेतले. हा थरार शनिवारी रात्री १० वाजता घडला.
नमीत संदीप कराळे (१७), संतोष किशोर गडमडे (२५) दोघेही रा. माळीपुरा यवतमाळ अशी मृतांची नावे आहेत. तर चालक धनराज बाबाराव राठोड (२५) याच्यासह गोवर्धन लक्ष्मण भेंडारे (२०) हे दोघे जखमी आहेत. पाढंरकवडा मार्गावरच्या एका हॉटेलमध्ये मित्राचा वाढदिवस असल्याने हे चौघे जण कारने (क्र.एमएच २९ एडी ४८८९) हॉटलेमध्ये पोहोचले. तेथे काही काळ घालविल्यानंतर तलावफैलातील एका मित्राला घरी सोडण्यासाठी परत आले. मित्राला सोडून पुन्हा हॉटेलकडे जात असताना धनराज हा सुसाट वेगाने गाडी चालवत होता. त्याचे कारवरचे नियंत्रण सुटल्यानंतर तो थेट रस्त्याच्या कडेवर असलेल्या निबांच्या झाडावर जाऊन धडकला. या धडकेत झाडाचे तुकडे झाले. धडक इतकी जबर होती की कारमध्ये बसलेल्या चौघांपैकी दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.
चालक धनराज व गोवर्धन याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोवर्धन भेंडारे याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चालक धनराज राठोड याच्या विरोधात भादंवि २७९, ३३८, ३०४ नुसार गुन्हा दाखल केला.
 

Web Title: The victim of 'Driving' with a crazy 'driving'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.