विद्यार्थिनीच्या खुनातील आरोपीने विष घेतले

By admin | Published: September 22, 2015 03:38 AM2015-09-22T03:38:38+5:302015-09-22T03:38:38+5:30

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा दत्तात्रयनगर परिसरात खून करून पसार झालेल्या संशयित आरोपी ओमप्रकाशने

The victim was murdered by the accused student | विद्यार्थिनीच्या खुनातील आरोपीने विष घेतले

विद्यार्थिनीच्या खुनातील आरोपीने विष घेतले

Next

यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा दत्तात्रयनगर परिसरात खून करून पसार झालेल्या संशयित आरोपी ओमप्रकाशने आपल्या मूळ गावी गोन्हा येथे विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनाच्या घटनेपासून पोलीस संशयित आरोपीच्या मागावर होते. मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.
लोहारा येथील विद्यार्थिनी सोनाली हिचा येथील दत्तात्रयनगर परिसरात चाकूने भोसकून शुक्रवारी निर्घृण खून झाला होता. वडगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू केला असता नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील गोन्हा येथील ओमप्रकाश गुजवार याचे नाव पुढे आले होते. त्याचा शोध पोलीस घेत होते. पोलिसांचे दोन पथकही तयार करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागातही ओमप्रकाशचा शोध सुरू होता. मोबाईल लोकेशनवरुन त्याचा शोध घेणे सुरु असताना सोमवारी त्याने विष प्राशन केल्याची माहिती वडगाव रोड पोलिसांच्या शोध पथकाला मिळाली.
पसार असलेला संशयित आरोपी पोलिसांच्या टप्प्यात आला. मात्र त्याने विष प्राशन केल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात दाखल केल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले. त्याच्या प्रकृतीबाबत कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी काटोल रुग्णालयात पोहोचले असून डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतरच संशयित ओमप्रकाशला ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तूर्तास वडगाव रोड पोलीस ओमप्रकाशच्या प्रकृत्तीवर लक्ष ठेऊन आहे.

Web Title: The victim was murdered by the accused student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.