फुटबॉल स्पर्धेत ‘वायपीएस’चा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 10:56 PM2017-09-22T22:56:35+5:302017-09-22T22:56:50+5:30

शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत फुटबॉल सामन्यामध्ये यवतमाळ पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी १४ व १७ वर्षे वयोगटात विजय संपादन केला.

The victory of 'Yps' in the football tournament | फुटबॉल स्पर्धेत ‘वायपीएस’चा विजय

फुटबॉल स्पर्धेत ‘वायपीएस’चा विजय

Next
ठळक मुद्देशालेय क्रीडा स्पर्धा : १४ व १७ वर्षे वयोगटातील खेळाडूंची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत फुटबॉल सामन्यामध्ये यवतमाळ पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी १४ व १७ वर्षे वयोगटात विजय संपादन केला. येथील नेहरू स्टेडियमवर हे सामने पार पडले.
१४ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी पोदार शाळेच्या चमूला ३-२ ने पराभूत करत विजय मिळविला. आर्यन आवटे, अथर्व महादानी, विनीत बागवाल यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. चमूमध्ये अथर्व महादानी, साहिल सोलंकी, शैलेश दिवानी, केतन ताजने, गौरांग पुनसे, विनीत बागवाल, निरांश पानतावने, मोहित चवरडोल, सार्थ धुमाळे, आर्यन शर्मा, आर्यन आवटे, अंशूल मेघवाड, सलीम दहीवलकर, आयूष गौरकर, हिमांशू भक्तीयार, आदित्य तुपवने, आदित्य गावंडे, इशान वार्डेकर, अमन दर्डा यांचा समावेश होता.
‘वायपीएस’च्या १७ वर्षे वयोगटातील चमूने महर्षी विद्यालयावर मात करत विजय मिळविला. आकाश छेत्री याने केलेल्या गोलसोबतच संघाला विजय मिळाला. अथर्व जयपूरकर, आयूष सागानी, स्पंदन धाडसे, प्रज्योत तायडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सुबर्तो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेतही यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या चमूमध्ये आयूष सागानी, यश तिकाडे, प्रज्योत तायडे, मोनिष राठोड, स्वस्तिक प्रधान, अमित खंडारे, आदित्य शिंदे, रोहित चव्हाण, राज राठोड, पीयूष निस्ताने, आकाश छेत्री, अनुज आडे, अथर्व जयपुरकर, स्पंदन धाडसे, प्रणव दायरे, नील बुटले, श्रेयश डांगे, आर्यन पवार, संस्कार घ्यार, यश मानकर, सैफ गिलाणी यांचा समावेश होता. त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या खेळाडूंना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रवीण कळसकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी या खेळाडूंचे कौतुक केले.

Web Title: The victory of 'Yps' in the football tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.