शल्यचिकित्सकांची विदर्भस्तरीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:27 PM2018-10-30T22:27:56+5:302018-10-30T22:28:37+5:30
वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात अॅन्युअल कॉन्फरन्स आॅफ विदर्भ सर्जन असोसिएशनची परिषद आयोजित करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या परिषदेत देशपातळीवरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात अॅन्युअल कॉन्फरन्स आॅफ विदर्भ सर्जन असोसिएशनची परिषद आयोजित करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या परिषदेत देशपातळीवरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून मार्गदर्शन केले. विदर्भातील ४०० शल्यचिकित्सकांनी सहभाग घेतला.
शल्यचिकित्सकांच्या विदर्भस्तरीय परिषदेचे आयोजन करण्याचा बहुमान यवतमाळला पहिल्यांदाच मिळाला. ‘व्हॅसकॉन-२०१८’ या परिषदेचे उद्घाटन पद्मश्री डॉ.प्रकाश व मंदाताई आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. एएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.दिलीप गाडे, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.अशोक अढावू उपस्थित होते. विदर्भ सर्जन असोसिएशनच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळाही झाला.
दिल्ली येथील डॉ.सभ्यसाची बल, डॉ.भाऊ हाडके, प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.रॉय पाटणकर, डॉ.समीर रेघे, डॉ.प्रशांत भांडारकर, डॉ.चिवटे, नागपूर येथील डॉ.राज गजभिये, डॉ.राहाटे, डॉ.मुकुंद ठाकूर, डॉ.अजय बोराळकर, डॉ.सतीश धारप, डॉ.निर्मल पटले, डॉ.लक्ष्मीकांत लाडूकर, डॉ.गोविंद कोडवाणी यांनी विद्यार्थ्यांना लठ्ठपणासाठीची शस्त्रक्रिया, तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया, हर्निया, अन्ननलिकेची शस्त्रक्रिया, दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया, मूळव्याध शस्त्रक्रिया, लेझरद्वारे शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारातील २५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
कार्यशाळेसाठी अधिष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार, विभाग प्रमुख डॉ.गिरीष जतकर यांनी पुढाकार घेतला. यावेळी शहरातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ.नारायण तावडे, डॉ.दामोदर बाहेती, डॉ.एम.एम. अग्रवाल, डॉ.सुहास श्रोत्री यांचा सत्कार करण्यात आला. परिषदेच्या आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष डॉ.गिरीष जतकर, सचिव डॉ. अमोल देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. आशीष तावडे यांच्यासह सहायक प्राध्यापक डॉ. विजय पोटे, डॉ.सुरेंद्र भुयार, डॉ. विनोद राठोड, डॉ.अशोक चौधरी, डॉ. विजय कावलकर, डॉ.हेमंत म्हात्रे, डॉ. राजा कडूकार, डॉ.निशांत चव्हाण, डॉ. विजय कनाके, डॉ.स्वप्नील मदनकर, बधिरीकरण विभाग प्रमुख डॉ. दामोधर पटवर्धन यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र
परिषदेत पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र व कार्यशाळा घेण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयातील शल्यचिकित्सा विभाग व विदर्भ सर्जरी असोसिएशन, सर्जन आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.