वणी येथे आजपासून विदर्भ साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:05 PM2018-01-18T22:05:21+5:302018-01-18T22:05:35+5:30

विदर्भ साहित्य संघाच्यावतीने आयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११ वाजता वणी येथील राम शेवाळकर परिसरात होणार आहे.

Vidarbha Sahitya Sammelan from Vani here today | वणी येथे आजपासून विदर्भ साहित्य संमेलन

वणी येथे आजपासून विदर्भ साहित्य संमेलन

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री येणार : साहित्यिकांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
राम शेवाळकर परिसर, वणी : विदर्भ साहित्य संघाच्यावतीने आयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११ वाजता वणी येथील राम शेवाळकर परिसरात होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ.शिरीष गो. देशपांडे, पूर्वाध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख उपस्थित राहतील.
संमेलनस्थळी उभारलेल्या स्व.धुं.गो. उपाख्य बाळासाहेब देशमुख स्मृती व्यासपीठावर होणाºया या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, मुख्य संयोजक माधव सरपटवार, कार्याध्यक्ष वामन तेलंग, शाखाध्यक्ष डॉ.दिलीप अलोणे, सरचिटणीस विलास मानेकर, आमंत्रक शुभदा फडणवीस उपस्थित राहणार.
आजचे कार्यक्रम
विदर्भ साहित्य संमेलनात राजा बढे कविसंमेलनाचे आयोजन सायंकाळी ५.३० वाजता डॉ.ज्ञानेश वाकुडकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले आहे. सूत्रसंचालन इरफान शेख करतील. यात प्रभू राजगडकर, कलीम खान, प्रशांत अनासरे, आबीद शेख, पवन नालट, माधवी भट, अशोक पळवेकर, डॉ.भास्कर पाटील, मनीषा अतुल, भाग्यश्री पेटकर, तीर्थराज कापगते, डॉ.प्रफुल्ल गवई, अनिल काळबांडे, मधुसूदन पुराणिक, सुनीता झाडे सहभागी होतील. रात्री ८ वाजता संजय भाकरे फाऊंडेशन निर्मित ‘बाप हा बापच असतो’ हे किरण पोत्रेकर लिखित दोनअंकी नाटक सादर केले जाईल.

Web Title: Vidarbha Sahitya Sammelan from Vani here today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.