विदर्भाच्या पाण्याचा तेलंगणा-आंध्रात वापर; आमदारांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:25 AM2018-01-09T11:25:06+5:302018-01-09T11:25:27+5:30

शासनाने बांधकाम प्रकल्प हाती न घेतल्यामुळे गोदावरी खोऱ्यातून विदर्भाच्या वाट्याला येणारे पाणी लगतचे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्य वापरत असल्याच्या गंभीर बाबीकडे काही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

Vidarbha's water used in Telangana-Andhra; Legislators raised eyebrows | विदर्भाच्या पाण्याचा तेलंगणा-आंध्रात वापर; आमदारांनी वेधले लक्ष

विदर्भाच्या पाण्याचा तेलंगणा-आंध्रात वापर; आमदारांनी वेधले लक्ष

Next
ठळक मुद्देगोदावरी खोऱ्यातील पाण्याचा वाटा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाने बांधकाम प्रकल्प हाती न घेतल्यामुळे गोदावरी खोऱ्यातून विदर्भाच्या वाट्याला येणारे पाणी लगतचे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्य वापरत असल्याच्या गंभीर बाबीकडे काही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
गोदावरी खोऱ्यात विदर्भाला लवादाने १९ हजार १९० दलघमी पाणी दिले. परंतु बांधकामासाठी प्रकल्प हाती न घेतल्यामुळे चार हजार ३८८ दलघमी आणि अपूर्ण प्रकल्पांमुळे सात हजार ७१३ दलघमी असे असून १२ हजार १०० दलघमी पाणी अद्याप वापरात आले नाही. त्यामुळे हे पाणी आंध्र व तेलंगणा ही राज्ये वापरत असल्याचा मुद्दा पाच आमदारांनी उपस्थित केला आहे. शिवाय बांधकामाधीन प्रकल्पांमुळे तापी खोऱ्यातील विदर्भाच्या वाट्याचे पाणी अद्याप मिळाले नाही, याकडे लक्ष वेधले गेले. मात्र ही बाब खरी नसल्याचे सांगत शासनाने विदर्भाला मिळणाऱ्या पाण्याचा हिशेब मांडला.
पाणी उपलब्धता झाली कमी
गोदावरी पाणी तंटा लवादानुसार विदर्भाला १९ हजार १९० दलघमी पाणी द्यायचे होते. मात्र २०१४ पासून पाणी उपलब्धता कमी झाल्याने गोदावरी खोऱ्यातून १८ हजार ५७ दलघमी पाणी वापराकरिता उपलब्ध होत आहे.
यातून पूर्ण प्रकल्पाचे ५९५६ दलघमी व नदीवरून बिगर सिंचन वापर ५२१ दलघमी असा ६४७७ दलघमी पाणी वापर निश्चित झाला आहे. आठ हजार १०३ दलघमी पाणी वापराचे प्रकल्प अद्याप बांधकामाधीन आहेत तर चार हजार २४३ दलघमी पाणी वापराचे प्रकल्प नियोजनाधीन असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
वने व पर्यावरणामुळे विलंब
बांधकामाधीन व नियोजनातील प्रकल्पास होणाऱ्या विलंबामागे वने व पर्यावरण खात्याकडून मान्यतेला बराच अवधी लागत असल्याचे कारण शासनाकडून पुढे केले गेले आहे. तापी खोऱ्यामध्ये दोन हजार ६०७ दलघमी पाणी उपलब्ध असून त्याचे नियोजन झाल्याचेही शासनाकडून सांगितले जात आहे.

Web Title: Vidarbha's water used in Telangana-Andhra; Legislators raised eyebrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी