मालखेड शाळेची विद्या प्राधिकरणाकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:29 AM2017-10-12T01:29:46+5:302017-10-12T01:29:58+5:30
नेर तालुक्यातील मालखेड (खु) येथील शाळेला विद्या प्राधिकरण पुणे येथील प्रमुख सल्लागार मयुरेष यांनी भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : नेर तालुक्यातील मालखेड (खु) येथील शाळेला विद्या प्राधिकरण पुणे येथील प्रमुख सल्लागार मयुरेष यांनी भेट दिली. आपल्याकडे तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध असतील तर त्यांचा वापर वर्गात करून काय साध्य करता येते, याबाबत त्यांनी तंत्रस्नेही शिक्षकांना मार्गदर्शन केले.
‘मित्रा यात्रा’ २०१७ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मयुरेष यांनी सविस्तर माहिती दिली. या शाळेने लोकवर्गणीतून १२० विद्यार्थ्यांना स्पोर्ट युनिफॉर्म पुरविला आहे. दिलीप पाटील बोबडे यांनी त्यासाठी ५० हजार रुपयांची वर्गणी दिली. शाळा डिजिटल करताना प्रत्येक वर्गात एलईडी, संगणक पुरविण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानातून सहावी, सातवी व आठवीसाठी एलईडी, टॅब देण्यात आले. टॅबमध्ये मित्रा यात्रा व इतर अॅपचा वापर करून अध्यापन केले जात आहे. यासाठी मुख्याध्यापक सुरेश कुलरकर, विषय शिक्षक चंद्रशेखर चर्जन, उषा शर्मा, सरोजबाला गवई, वंदना भानसे, रूपाली चवाळे आदी शिक्षकवृंद परिश्रम घेत आहे. याच उपक्रमाची दखल घेऊन विद्या प्राधिकरणाचे मयूरेष हे अधिक मार्गदर्शनासाठी शाळेत आले.
या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी राजीव ठाकरे, विस्तार अधिकारी सुरेश राठोड, केंद्रप्रमुख आर. के. उमरे, कसोटे, व्ही. एस. सौदागर, हजारे, साधन व्यक्ती प्रकाश माहुरे, शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला शिक्षक कडू, चेर, खाडे, मिस्कीन, ग्लालबंश, मानवटकर, पहूरकर, चर्जन, भांडे, सोहळे उपस्थित होते.