दिग्रसमध्ये हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन
By admin | Published: June 26, 2017 12:52 AM2017-06-26T00:52:20+5:302017-06-26T00:52:20+5:30
तालुका पत्रकार संघटना व पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इफ्तार पार्टी, विद्यार्थ्यांचा गौरव आणि .....
इफ्तार पार्टी : पत्रकार संघटना, पोलीस ठाण्याचा पुढाकार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुका पत्रकार संघटना व पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इफ्तार पार्टी, विद्यार्थ्यांचा गौरव आणि शांतता समितीच्या सभेत हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडले. सर्वधर्मीय नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शहराच्या लौकिकात भर टाकली.
अध्यक्षस्थानी तहसीलदार किशोर बागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून काजी मौलाना अबुल जफर, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामू पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नीलेश पांडे, नगरपरिषद मुख्याधिकारी शेषराव टाले, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या सफाई कामगार आयोग अध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल रामू पवार, संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) यश संपादन करणारे परीक्षित झाडे व प्रज्ञा खंडारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी-बारावीतील ९५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.संचालन मजहर अहमद खान यांनी, प्रास्ताविक पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी तर आभार सहायक पोलीस निरीक्षक गजानन खार्डे यांनी मानले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य हितेश राठोड, लखन राठोड, नगरपरिषद शिक्षण सभापती सैयद अक्रम, बांधकाम सभापती बाळू जाधव, नगरसेवक केतन रत्नपारखी, भाजपा जिल्हा सरचिटणीस महादेव सुपारे, प्रमोद बनगिनवार, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, पंचायत समिती सदस्य अरविंद गादेवार, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजा चव्हाण, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष लालसिंग राठोड, सुधीर देशमुख, पूनम पटेल, जावेद पटेल, अरबाज धारिवाला, अॅड.देशपांडे, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, मुख्याध्यापक गोरटे, संजय कुकडी, सुरेश चिरडे, प्रकाश सातघरे, अभय इंगळे, रामदास पद्मावार, संजय शुक्ला, लक्ष्मण टेकाळे, विलास निकम, प्रफुल्ल व्यवहारे, अशोक जाधव, गोपाल शहा, मेमन जमातीचे अध्यक्ष हाजी हारून इसाणी, हाजी शौकत मलनस, गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, जामा मशिद ट्रस्टचे अध्यक्ष मिर्झा अफजल बेग, शिवतेज संघटनेचे अध्यक्ष संतोष झाडे, डॉ.दत्तात्रय ढोले, इद्रीस डोसाणी, हाजी करीम नागपुरे, फैयाज मलनस, स्वप्नील दुधे, नंदराज गुर्जर, संजय खंडारे, पुंडलिकराव इंगळे, शरद गोविंदवार, उद्धव अंबुरे आदी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी दिग्रस तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर कांबळे, सचिव यशवंत सुर्वे, प्रवीण ठाकूर, संदीप रत्नपारखी, अमीन चव्हाण, हनुमान रामावत, धर्मराज गायकवाड, अजीस शेख, कपिल इंगोले, नसीम बेग, श्यामकुमार लोखंडे, शरद गोविंदवार, अक्षय बरतेरे, प्रशांत झोळ, अ. रफिक, मुनीर खान, रामेश्वर जाजडा, उद्धव अंबुरे, आनंद आडे, वसंत चव्हाण, गौतम तुपसुंदरे, अजीम खान, विष्णुपंत यादव, राजू कदम, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक, बाबाराव पवार, गणेश मोरे, अ.रफीक, अनंता उघडे, पुंडलिक वानखड़े, नारायण पवार आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.