किन्हाळा-घोडदरा परिसरात वाघाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:49 PM2018-10-12T23:49:11+5:302018-10-12T23:49:25+5:30

१३ जणांचे बळी घेणाºया नरभक्षक वाघिणीची तालुक्यात प्रचंड दहशत असतानाच वन कर्मचाऱ्यांना आता उमरीनजीकच्या किन्हाळा व घोडदरा परिसरात वाघ आढळून आल्यामुळे तालुक्यात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

View of the tiger in the Kishala-Ghodadara area | किन्हाळा-घोडदरा परिसरात वाघाचे दर्शन

किन्हाळा-घोडदरा परिसरात वाघाचे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देपांढरकवडाचे नागरिक दहशतीत : गस्तीवर वनकर्मचाऱ्यांना दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : १३ जणांचे बळी घेणाºया नरभक्षक वाघिणीची तालुक्यात प्रचंड दहशत असतानाच वन कर्मचाऱ्यांना आता उमरीनजीकच्या किन्हाळा व घोडदरा परिसरात वाघ आढळून आल्यामुळे तालुक्यात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरूवारी सायंकाळच्या सुमारास पांढरकवडा वनविभागाचे काही कर्मचारी व वनमजूर येथून १० किलोमीटर अंतरावरील उमरीनजीकच्या किन्हाळा-घोडदरा जंगल परिसरात गस्तीवर असताना त्यांना एका झुडूपात अचानक पट्टेदार वाघ दिसून आला. ही नरभक्षक वाघिण तर नाही ना, अशी शंका या कर्मचाऱ्यांना आली व त्यांनासुद्धा घाम फुटला. परंतु वाघिण नसून वाघ असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. ही वार्ता परिसरात पसरताच उमरी, किन्हाळा, घोडदरा, वाठोडा, मोहदरी, जीरा, मिरा व परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हा वाघ या जंगलात नेमका आला कुठून, याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये मतभिन्नता आहे. एक वर्षापूर्वी चक्क रूंझा व वाठोडा या रस्त्यावरच वाघ आढळून आला होता. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होेते. वर्दळीचा असलेला हा रस्ता सूनसान झाला होता. आता पुन्हा किन्हाळा-घोडदरा परिसरात वाघ आढळून आला.

Web Title: View of the tiger in the Kishala-Ghodadara area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.